भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तीनही प्रकारात सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. फलंदाजीमध्ये अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले आहेत. तसेच त्याच्या नावे ७० आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे. परंतु, गेल्या २ वर्षांपासून तो आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. याचा अंदाज तुम्हाला या गोष्टीवरून येईल की, इंग्लिश कर्णधार जो रुटने जितक्या धावा केल्या आहेत. त्याच्या २५ टक्के धावा देखील विराट कोहलीला करता आल्या नाही.
क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे कधी दुखापत होईल आणि फलंदाज आपला फॉर्म गमावणार, हे सांगता येत नाही. भारतीय संघासोबत देखील असेच काहीतरी झाले आहे. या संघातील एक नव्हे तर चक्क तीन फलंदाजांनी आपला फॉर्म गमावला आहे. विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या तिन्ही फलंदाजांना मिळून १ जानेवारी २०२१ पासून अवघ्या १०५५ धावा करता आल्या आहेत. या धावा रूटने केलेल्या एकूण धावांपेक्षा २२२ धावांनी कमी आहेत.
जो रूटने केल्या आहेत ६७.२१ च्या सरासरीने धावा
जो रूट २०२१ वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने यावर्षी एकूण १० सामने खेळले आहेत. यात त्याने ६७.२१ च्या सरासरीने एकूण १२७७ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ५ शतक झळकावले आहेत. त्याने लॉर्ड्स कसोटीत देखील इंग्लंड संघ अडचणीत असताना नाबाद १८० धावांची खेळी केली होती.
विराटने यावर्षी ७ सामन्यांत २९१ धावा, रहाणेने ९ सामन्यांत ३३० धावा आणि पुजाराने ९ सामन्यांत ४३४ धावा केल्या आहेत.
रोहित आणि पंतमुळे भारतीय संघाने मिळवला विजय
विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे मुख्य फलंदाज फ्लॉप ठरत आहेत, तरीदेखील भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघाने इतर कुठल्याही संघापेक्षा जास्त कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. याचे श्रेय रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांच्या फलंदाजीला आणि गोलंदाजांच्या कामगिरीला जाते.
या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. तर रिषभ पंत चौथ्या स्थानी आहे. रोहितने यावर्षी ९ कसोटी सामन्यात १ शतक झळकावत ६९० धावा केल्या आहेत. तसेच रिषभ पंतने यावर्षी खेळलेल्या ९ कसोटी सामन्यात ६४४ धावा केल्या आहेत. रिषभ पंतने देखील एक शतक झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जेम्स अँडरसन आणि शमीला तर मागे सोडले, आता शाहीन आफ्रिदी तोडू शकतो सिराजचा ‘हा’ विक्रम
‘फिटनेस किंग’ विराट कोहली पितो ब्लॅक वॉटर, एका लीटरची किंमत उडवेल तुमची झोप