भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो आपल्या पत्नी सोबत राहण्यासाठी पालकत्व रजेवर मायदेशात परतला होता. त्यानंतर उर्वरित तीन सामन्यात भारतीय संघाची कमान अजिंक्य रहाणेच्या हाती दिली होती. त्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी मुलीचा जन्म झाला होता. मुलीच्या जन्माची माहिती विराट कोहलीने 11 जानेवारीला सोशल मिडीयावरून दिली.
विराट कोहली लिहले होते की, “आम्हा दोघांना हे सांगण्यास आनंद होत आहे की, आज दुपारी आमच्या येथे मुलीचा जन्म झाला. आम्ही तुमच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत. अनुष्का आणि मुलगी दोघे ही ठीक आहेत. हे आमचे सौभाग्य आहे की, आम्हाला जीवनातील हा धडा अनुभवायला मिळाला. आम्हाला माहित आहे की, तुम्ही हे नक्कीच समजाल की, या वेळी आम्हा सगळ्यांना थोडी प्रायव्हसी हवी आहे. ”
आता मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सार्वजनिक ठिकाणी दिसून आले आहेत. मुलीच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा क्लिनिकमध्ये गेली होती. या दरम्यान त्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये विराट कोहली काळा टीशर्ट आणि ट्राउझर परिधान केला होता. त्याचबरोबर अनुष्का शर्माने निळ्या रंगाची डेनिम जिन्स अणि शर्ट मध्ये दिसून आली.
https://www.instagram.com/p/CKTEMpHn5-j/?igshid=13l0fu01tewmm
मुलीच्या जन्मानंतर विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाऊंटचा बायो बदलला आहे. आणि त्याच्या नवीन फिचरने चाहत्यांची मने जिंकत आहे. विराट कोहलीने आपला बायो बदलताना लिहले आहे की, एक गौरवशाली पिता आणि पती. त्याचबरोबर त्याने हृदयाचे इमोजी सुद्धा जोडले आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा हा बायो चाहत्यांना खूप आवडत आहे. त्यामुळे चाहते विराटचे कौतुक करत आहेत.
यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माने बेबी बंप सोबत एक फोटो शेअर करत आपल्या घरात पाहुणा येणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यांनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला होता. त्या ठिकाणी वनडे, टी-20 आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. यामध्ये विराट कोहली वनडे आणि टी-20 मालिका खेळून कसोटी मालिकेतील पहिला सामना एॅडलेड येथे खेळला गेला. त्यानंतर विराट कोहली पालकत्व रजेवर मायदेशी परतला.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या घातक खेळाडूंचे पुनरागमन
आयएसएल २०२१ : सुपर सब विल्यम्सच्या गोलमुळे एटीके मोहन बागान विजयी






