भारतीय संघाने नुकत्याच ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला 3 विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना जिंकत चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या विजयात भारतीय संघाच्या रिषभ पंतने महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने अखेरच्या कसोटीत केलेल्या नाबाद 89 धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला. त्यानंतर रिषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव बघायला मिळाला.
वडील करुन घ्यायचे सराव –
रिषभ पंतचे वडील राजिंदर त्याला उत्तराखंडमधील रुडकी येथे सराव करताना मदत करायचे. ते पंतचा सराव करून घेतांना रिषभ पंतच्या छातीवर उशी बांधून कॉर्क चेंडूने सराव करून घेत असत. कारण रिषभ पंतच्या मनातील गोलंदाजाबद्दल असलेली भीती निघून जावी. राजिंदर आपल्या मुलाची ताकद वाढवण्यासाठी एनर्जी पावडर असलेले दूध प्यायला द्यायचे. त्यामुळे रिषभ पंतची ही ताकद ब्रिस्बेन येथील सामन्यात दिसून आली.
ज्यांनी- ज्यांनी रिषभ पंतने ब्रिस्बेन येथील सामन्यात खेळलेली खेळी पाहिली. त्या खेळी मागे उत्तराखंड येथील एका छोट्याशा गावातून मिळालेले धडे कारणीभूत आहेत. दुर्दैव होते की ही खेळी पाहण्यासाठी रिषभ पंतचे वडील जगात नाही.
घराच्या छतावर क्रिकेटचे धडे गिरवले होते.
राजिंदर यांनी काही वर्षापूर्वी सांगितले होते की, मी रुडकी येथील आपल्या घरावर सिमेंटने तयार केलेल्या छतावर त्याचा कॉर्क चेंडूने सराव करून घेत होतो. जिथे चेंडू वेगाने येतो. त्या काळी शहरात कोणते टर्फची खेळपट्टी नव्हती. मी त्याच्या छातीवर उशी बांधायचो. कारण वेगवान चेंडू खेळताना त्याला दुखापत होवू नये. मात्र त्याला दुखापत झाली आणि फ्रॅक्चर झाले. हे सर्व मी यासाठी करत होतो, कारण त्याच्या मनातील भीती निघून जावी म्हणून करत होतो. हे अतिरिक्त प्रशिक्षण होते.” अशा प्रकारे राजिंदर आपल्या मुलाला क्रिकेटचे धडे देत होते.
आपल्या मुलाला क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे रिषभ पंत वडील राजिंदर आणि आई सरोज यांनी त्याला दिल्ली येथे तारक सिन्हा यांच्याकडे पाठवले. रुडकी पासून दिल्लीचा प्रवास सोपा नव्हता. रिषभ पंतची आई पहाटे तीन वाजता उठून मुलाला सोनेट क्लब मध्ये शनिवार आणि रविवार सराव करता यावा यासाठी बस पकडत असत. त्यांच्या मुलाला सराव करता यावा म्हणून त्या शनिवारी गुरूद्वरात थांबत. ज्यामुळे रिषभ पंतला रविवारी सराव सत्रात भाग घेता यावा. त्यानंतर रिषभ दिल्लीत भाडेच्या घरात राहू लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
“कृपया माझी तुलना धोनीसोबत करू नका”, रिषभ पंतने केली विनंती
‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची विकेट खास, मोहम्मद सिराजने केला खुलासा
आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी श्रीसंत सज्ज; ‘हे’ तीन संघ लिलावात बोली लावण्याची शक्यता