एस श्रीसंतने नुकतेच सात वर्षाची बंदी पूर्ण झाल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तो आयपीएल स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. याची माहिती श्रीसंतने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लाइव्ह येत दिली. तो यंदा आयपीएल स्पर्धेच्या लिलावात आपले नाव सामील करणार आहे. त्याचबरोबर आयपीएल मधील बर्याच संघांनी त्याला फिटनेसवर लक्ष द्यायला सांगितले आहे.
एस श्रीसंतने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतून क्रिकेट मध्ये पुनरागमन केले होते. या स्पर्धेत त्याने केरळ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने केरळ संघाकडून 5 सामने खेळताना 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर केरळ संघाचा तो तिसरा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. तसेच तो खेळाडूंना स्लेजींग करताना सुद्धा दिसून आला होता. श्रीसंतने क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना सांगितले होते की, त्याला भारतीय संघाला 2023 मध्ये होणारा विश्वचषक जिंकून द्यायचा आहे. त्याचबरोबर त्याला पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा आहे. त्यामुळे आज आपण या लेखामधून हे जाणून घेणार आहोत की आयपीएलच्या 14 व्या हंगामापूर्वी होणार्या लिलावात, कोणते तीन संघ श्रीसंतला आपल्या संघात खरेदी करू शकतात.
1. चेन्नई सुपर किंग्ज-
चेन्नई सुपर किंग्ज संघाची गोलंदाजी कमकुवत दिसून येत आहे. मागील हंगामात या संघात अनुभवी गोलंदाजांची कमतरता जाणवली आहे. त्यामुळे महेंद्र सिंग धोनी एका अनुभवी गोलंदाजाच्या शोधात आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी श्रीसंत हा चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी लिलावात चेन्नई सुपर किंग्ज हा संघ श्रीसंतला खरेदी करू शकतो. त्यामुळे श्रीसंतची चेन्नई संघात खेळण्याची शक्यता आहे.
2. किंग्ज इलेव्हन पंजाब-
श्रीसंतने आपल्या आयपीएल कारकिर्दीला 2008 साली सुरुवात केली होती. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून आयपीएल स्पर्धा खेळायला सुरुवात केली होती. आयपीएलच्या पहिल्या हंगामात पंजाब संघाकडून खेळताना श्रीसंतने या पूर्ण हंगामात 19 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे या स्पर्धेतील सर्वात यशस्वी ठरलेला दुसरा गोलंदाज होता. त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे मोहम्मद शमी व्यतिरिक्त कोणताही अनुभवी वेगवान गोलंदाज नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी श्रीसंत महत्वाचा गोलंदाज ठरू शकतो. कारण त्याच्याकडे आयपीएल स्पर्धेचा अनुभव आहे. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाब संघ श्रीसंतला खरेदी करू शकतो.
3. राजस्थान रॉयल्स-
श्रीसंतवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला होता, तेव्हा तो राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता. त्यामुळे बंदी घालण्यापूर्वी तो राजस्थान रॉयल्स संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. तसेच राजस्थान रॉयल्स संघाकडे आता वेगवान गोलंदाज म्हणून कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट उपलब्ध आहेत. कार्तिक त्यागीकडे आयपीएल स्पर्धेचा अनुभव कमी आहे. त्याचबरोबर जयदेव तितक्या वेगाने गोलंदाजी करत नाही. त्यामुळे या संघाला एका अनुभवी वेगवान गोलंदाजाची गरज आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स यंदाच्या लिलावात श्रीसंतला खरेदी करू शकतो.
महत्वाच्या बातम्या:
भारतीय संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर
“आयपीएल २०२१ मध्ये कोलकाताचा संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल”, प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास
आमचा, आपला मलिंगा! मुंबई इंडियन्सचे निवृत्ती घेतलेल्या लसिथ मलिगासाठी खास ट्विट, पाहा व्हिडिओ