fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयएसएल २०२१ : सुपर सब विल्यम्सच्या गोलमुळे एटीके मोहन बागान विजयी

January 21, 2021
in टॉप बातम्या, फुटबॉल
0

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात एटीके मोहन बागानने चेन्नईयीन एफसीवर 1-0 असा विजय मिळविला. बदली खेळाडू डेव्हिड विल्यम्स याने अखेरच्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला.

फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी झाली. आघाडी फळीतील ऑस्ट्रेलियाचा 32 वर्षीय बदली खेळाडू डेव्हिड विल्यम्स याने हा गोल केला. मध्य फळीतील जेव्हीयर हर्नाडेझ याने घेतलेल्या कॉर्नरवर त्याने हेडिंगवर फिनिशींग केले. अखेरच्या क्षणी चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याचा अंदाज चुकला.

एटीकेएमबीचे प्रशिक्षक अँटोनिओ लोपेझ हबास यांनी 67व्या मिनिटाला मध्य फळीतील कार्ल मॅक््ह्युज याच्याऐवजी विल्यम्सला आघाडी फळीत पाचारण केले होते. संघाचे आक्रमण भक्कम करीत चेन्नईयीनवर दडपण आणण्याचा त्यांचा निर्णय अचूक ठरला.

एटीकेएमबीचा हा 12 सामन्यांतील सातवा विजय असून तीन बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 24 गुण झाले आहेत. त्यांचे दुसरे स्थान कायम राहिले. त्यांना करता आले आहेत, पण त्यांच्याविरुद्ध केवळ पाच गोल झाले आहेत. मागील सामन्यात एफसी गोवाविरुद्ध एटीकेएमबीला 1-1 अशी बरोबरी साधावी लागली होती, तर त्याआधी मुंबई सिटीविरुद्ध एकमेव गोलने पराभव झाला होता. त्यामुळे हा निकाल एटीकेएमबीसाठी महत्त्वाचा ठरला.

मुंबई सिटी एफसी 11 सामन्यांतून 26 गुणांसह आघाडीवर आहे. तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवा संघाचे 12 सामन्यांत 19 गुण आहेत. हैदराबादचा चौथा क्रमांक असून 12 सामन्यांत त्यांचे 17 गुण आहेत. चेन्नईयीनला 12 सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व सहा बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 15 गुण व सहावे स्थान कायम राहिले.

सामन्याची सुरुवात चुरशीने झाली. दुसऱ्याच मिनिटाला एटीकेएमबीचा मध्यरक्षक साहील शेख याने मध्य क्षेत्रात चेंडूचा ताबा गमावला. या संधीचा फायदा घेत चेन्नईयीनचा स्ट्रायकर इस्माईल गोन्साल्वीस याने चेंडू ताब्यात घेऊन घोडदौड सुरु केली. त्याचवेळी प्रतिस्पर्धी बचावपटू टिरी याने त्याला पाडले. त्यामुळे चेन्नईयीनला फ्री किक मिळाली. मध्यरक्षक मेमो मौरा याने ती घेतली, पण त्याने मारलेला चेंडू खेळाडूंच्या भिंतीला लागला.

पाचव्या मिनिटाला चेन्नईयीनला पहिला कॉर्नर उजवीकडे मिळाला. बचावपटू रिगन सिंगने तो घेतलवा, पण त्याच्या फटक्यात अचूकता नव्हती.
नवव्या मिनिटाला गोन्साल्वीसने एटीकेएमबीचा मध्यरक्षक कार्ल मॅक््ह्युज याला चकवून चेंडूवर ताबा मिळविला. त्याच्या पासवर रहीम अलीने घोडदौड केली, पण त्याला फिनिशींग करता आले नाही.

14व्या मिनिटाला एदू गार्सियाचा हेडींगवरील प्रयत्न फोल ठरला. 17व्या मिनिटाला मानवीर सिंगने रॉय कृष्णाला पास देण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिस्पर्धी बचावपटूंच्या दडपणामुळे तो फोल ठरला. 21व्या मिनिटाला जेव्हीयर हर्नांडेझने मारलेला फटका चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याने डावीकडे झेपावत अडविला.

दुसऱ्या सत्रात डेव्हिड विल्यम्सने उजवीकडे चेंडूवर ताबा मिळवित आगेकूच केली. त्याने दिलेल्या पासवर हर्नांडेझने फटका मारला, पण मेमो मौराने चेन्नईयीनचे क्षेत्र सुरक्षित राखले. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला हर्नांडेझने प्री किकवर नेटच्या उजव्या कोपऱ्याच्या दिशेने चेंडू मारला. कैथने झेप टाकत चेंडू थोपविला.

संबधित बातम्या:

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

आयएसएल २०२०-२१ : दहा खेळाडूंनिशी ईस्ट बंगालने चेन्नईयीनला रोखले

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी


Previous Post

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, ‘या’ घातक खेळाडूंचे पुनरागमन

Next Post

“बीसीसीआयने विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करण्याचा विचार करावा”, इंग्लंडच्या माजी खेळाडूचे मत 

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Next Post

"बीसीसीआयने विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करण्याचा विचार करावा", इंग्लंडच्या माजी खेळाडूचे मत 

मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले विराट आणि अनुष्का; पाहा व्हिडिओ

"पंचांनी आम्हाला मैदान सोडण्याचाही पर्याय दिला होता, पण...", मोहम्मद सिराजने उलगडला सिडनीतील वर्णद्वेषी शेरेबाजी प्रकरणाचा घटनाक्रम

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.