---Advertisement---

खराब फॉर्मातील विराट करू लागला ‘राम’ नामाचा जप, अनुष्कासोबतचा फोटो व्हायरल

On: शनिवार, जुलै 16, 2022 2:48 PM
---Advertisement---

विराट कोहली सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट सहभागी नव्हता. दुसऱ्या वनडेमध्ये विराट खेळला, पण अवघ्या १६ धावांवर बाद झाला. सततच्या खराब प्रदर्शनामुळे विराटवर मोठ्या प्रामाणात टीका केल्या जात आहेत. विराटवर देखील चांगले प्रदर्शन करण्यासाठी खूप दबाव तयार झाला आहे. यादरम्यान विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा एका भजन कीर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. या दोघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अमेरिकी गायक कृष्णा दास यांनी लंडनमध्ये भजन-कीर्तनाचे आयोजन केले होते. त्यांनी यापूर्वीही अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी आवर्जून उपस्थित राहिले. कृष्णा दास यांचा एक शिष्य हनुमान दास याने विराट आणि अनुष्काचा फोटो स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हनुमान दासने सांगितल्याप्रमाणे हे दोघेही कार्यक्रमात सहभागी झाले होते. राम नामाचा हा कार्यक्रम काही तास चालला, ज्याचे काही व्हिडिओही समोर आले आहेत.

Virat-Kohli-Viral-Photo
Photo Courtesy: Instagram/Hanuman_dass, Screengrabs

दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यातील वनडे मालिकेचा विचार केला, तर पहिल्या सामन्यात भारतीय संघ १० विकेट्स राखून जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात मात्र भारताचे फलंदाज अपयशी ठरले आणि संघाला १०० धावांच्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (१७ जुलै) खेळला जाणार आहे. वनडे मालिका १-१ अशा बरोबरीवर असल्यामुळे शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे.

शेवटचा सामना मॅनचेस्टरच्या ओल्डट्रेफर्ड स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्टेडियमवर इंग्लंड आणि भारत संघ यापूर्वी ४ वेळा आमने सामने आले आहेत. भारतीय संघ त्यापैकी फक्त एक सामना जिंकू शकला आहे, तर दुसरीकडे इंग्लंडने मात्र तीन सामने जिंकले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

‘विराटबाबत कपिल देव बोलले ते योग्यच’, असे म्हणत पाकिस्तानच्या दिग्गजाने कोहलीवर साधला निशाना

‘विराटच्या दुखण्यावर फक्त सचिनच करू शकतो मलमपट्टी’, जडेजाचे मोठे विधान

टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये मोडीत निघणार ‘हे’ १० विक्रम, वाचा भारत कोणत्या बाबतीत आहे आघाडीवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---