---Advertisement---

एक हात मदतीचा! कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘विरुष्का’ने लावला हातभार, दिली ‘इतक्या’ कोटींची देणगी

Virat Kohli, Anushka Sharma
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नुकताच आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यानंतर घरी परतला आहे. भारतातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. दिवसाला हजारो लोक आपले प्राण गमावत आहेत. अशातच अनेक परदेशी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेटपटूंनी मदत केल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यात आता भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही मदतीचा हात पुढे केला आहे.

विराट कोहलीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामधे तो आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “मी आणि अनुष्काने केट्टोसोबत मिळून एक मोहीम सुरू केली आहे. ज्यामुळे कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अधिक देणगी जमा करता येईल. त्यामध्ये आपण केलेल्या सहकार्याने आम्हाला आनंद होईल. आपण एकत्र येऊया आणि आपल्या आजूबाजूच्या गरजूंची सेवा करूया आणि त्यांना मदत करूया.”

https://twitter.com/imVkohli/status/1390532345753522180?s=20

केट्टो ही आशियातील सर्वात मोठी विश्वसनीय संस्था आहे. जिथे कुठल्याही चांगल्या उपक्रमासाठी निधी गोळा करणे, दान करणे आणि लोकांना वैद्यकीय सेवा देण्याचे काम केले जाते. तसेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी २ कोटींची मदत केली आहे.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1390534267902431234?s=20

मंगळवारी (४ मे) घरी पोहोचल्यानंतर विराटने युवा सेनेचे सदस्य राहुल एन कनल यांची भेट घेतली होती. भारतीय कर्णधाराने या कठीण काळात राज्य आणि देशाला सपोर्ट करण्यासाठी भेट दिली होती. तसेच या भेटीचे फोटो राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. ज्यामध्ये दोघेही चर्चा करताना दिसून आले होते. तसेच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आपल्या कर्णधारासोबत भेट, त्यांच्या प्रयत्नांसाठी खूप प्रेम आणि आदर. जे त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात केले आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी शब्द नाहीयेत. फक्त सन्मान आणि प्रार्थना आहे.”

https://twitter.com/Iamrahulkanal/status/1389926284348645385?s=20

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची उल्लेखनीय कामगिरी
गेल्या १३ हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. परंतु या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. बेंगलोर संघातील फलंदाज देवदत्त पडीक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलीयर्स आणि कर्णधार कोहली यांनी मोलाची भूमिका बजावली होती. तसेच गोलंदाज देखील चांगल्याच फॉर्ममध्ये होते. हर्षल पटेलने या हंगामात उल्लेखनीय गोलंदाजी केली होती. तसेच मोहम्मद सिराजनेही त्याला चांगली साथ दिली होती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या हंगामात ७ सामने खेळले होते. यात त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच हा संघ गुणतालिकेत १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता.

महत्त्वाच्या बातम्या-

इरफान पठाणवर वृद्ध दांपत्याचा सुनेसोबत अवैध संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप, दिली आत्महत्या करण्याची धमकी

गोल्डन, सिल्वर अन् डायमंड डक करणाऱ्या पूरनची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हा फोटो डोक्यात ठेवेल आणि…’

धोनीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, पत्नीने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---