चाहत्यांना विराट कोहलीकडून इंग्लंड दौऱ्यात खूप अपेक्षा होत्या. परंतु विराट त्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. मागच्या मोठ्या काळापासून विराट निराशाजनक प्रदर्शन करत आहे. विराटला अलिकडच्या काळात दिल्या जाणाऱ्या सततच्या विश्रांतीवर देखील अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दौऱ्यात विश्रांतीवर असल्यामुळे विराटला कुटुंबीयांसोबत वेळ घेलवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. विराट, त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका सोबत पॅरिस मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
भारतीय संघ सध्या वेस्टे इंडीज दौऱ्यावर आहे. विराट कोहली (Virat Kohli) याला या मालिकेत विश्रांती मिळाल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या. पण नंतर अशी माहिती समोर आली की, विराटने स्वतः मागणी केल्यानंतर त्याला विश्रांती दिली गेली आहे. अशात या मोकळ्या वेळेत विराट त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. कोहली कुटुंबीय पॅरिसमध्ये गेल्याचे समोर येत आहे.
अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हॅटेल रूममधील एक फोटो शेअर केल्यामुळे याविषयी माहिती मिळाली. पॅरिसमध्ये सथ्या सुट्ट्या घालवण्यासाठी योग्य वेळ नाहीये. त्याठिकाणचे तापमान ४० डिग्री सेल्सियसच्या आसपास पोहोचले आहे. याच कारणास्तव कोहली कुटुंबीय देखील या तळपत्या उन्हात बाहेर जाऊ शकले नसावेत. अनुष्काने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्येही तिने तापमानाविषयी माहिती दिली आहे.
विराटचे अलिकडे प्रदर्शन पाहता, त्याने लवकरात लवकर फॉर्ममध्ये परतणे भारतीय संघासाठी महत्वाचे आहे. आगामी काळात भारताला आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियात खेळवला जाणारा आयसीसी टी-२० विश्वचषक खेळायचा आहे. याच दोन महत्वाच्या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर विराट लय मिळण्यासाठी जिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकतो.
बीसीसीआयच्या एका सुत्राने अशी माहिती दिली आहे की, “आशा आहे की, क्रिकेटमधून घेतलेली ही विश्रांती त्याला मानसिक रूपाने ताजेतवाने बनण्यासाठी मदत करेल आणि तो स्वतःच्या फॉर्ममध्ये पुन्हा येईल. परंत क्रिकेट खेळल्याशिवाय हे शक्य होणार नाही. त्यामुळेच आमची इच्छा आहे की, त्याने जिम्बाब्वेविरुद्ध खेळावे. हा त्याचा आवडता प्रकार आहे (एकदिवसीय). आशिया चषकाच्या आधी लय मिळवण्यासाठी त्याला या मालिकेमुळे मदत मिळेल. आम्ही संघ निवडीविषयीचा निर्णय मालिका जवळ आल्यावर घेऊ.”
दरम्यान, भारतीय संघाला हा जिम्बाब्वे दौरा पुढच्या महिन्यात करायचा आहे. मागच्या सहा वर्षातील हा भारताचा पहिला जिम्बाब्वे दौरा आहे, ज्यामध्ये संघाला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी संघाला वेस्ट इंडीज दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अर्रर्र! इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना न खेळल्याने बुमराहला मोठा धक्का, आयसीसी वनडे क्रमवारीत नुकसान
इंग्लंडला चारली धूळ आता वेस्ट इंडीजचे बारी, जाणून घ्या आमने-सामने कामगिरी
स्टोक्सच्या खांदयावर बंदुक ठेवत पीटरसनने साधला निशाणा! म्हणाला, ‘मला तर बॅन केले…’