भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगामध्ये बरेच चाहते आहेत. त्याच्या कामगिरीमुळे आजी-माजी खेळाडूही त्याचे कौतुक करतात. यातच त्याने टाकलेल्या फोटोवर इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे या दोघांनी विनोदी सवांद साधला आहे.
विराटने ट्विटरवर ‘सूर्यप्रकाशात मजा घेत आहे’ असे कॅप्शन असलेला फोटो टाकला आहे. याला केविनने ‘तू सूर्यप्रकाशात नाही तर अधिक सावलीत बसला आहे’ अशी प्रतिक्रीया दिली होती.
https://twitter.com/KP24/status/1088325486827196416
विराटने हे संभाषण वाढवत केविनला ‘तू माझे पहिले कॅप्शन बघायला पाहिजे होते. ते या ही पेक्षा वाईट होते’. ‘माझा चेहरा अजूनही सूर्यप्रकाशात आहे’, असेही पुढे म्हटले आहे.
याला केविनने ‘यावेळी मी तुला जाऊ देतो कारण तू माझा आवडता खेळाडू आहे.’
https://twitter.com/KP24/status/1088330255071354880
ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर विराट आणि भारतीय संघाने त्यांचा फॉर्म कायम राखत न्यूझीलंड विरुद्धही पहिल्या वन-डे सामन्यात विजय मिळवला. यावेळी 157 धावांचा पाठलाग करताना विराटने 45 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–गतविजेत्या विदर्भाची यावर्षीही रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक,उमेश यादवची चमकदार कामगिरी
–टीम इंडियाचे माऊंट मॉनगनुईमध्ये झाले पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागत, पहा व्हिडिओ
–वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!