भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान वनडे विश्वचषक 2023 मधील पाचवा सामना खेळला जात आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघ संकटात सापडलेला. भारतीय संघाने आपले तीन फलंदाज केवळ 2 धावांवर गमावले होते. या कठीण परिस्थितीतून विराट कोहली व केएल राहुल यांनी भारताला बाहेर काढत शतकी भागीदारी रचली. सोबतच दोघांनी आपापली अर्धशतके देखील पूर्ण केली.
भारताच्या सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव फक्त 199 धावांवर गुंडाळला. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी भारतासाठी सलामी दिली. मात्र किशन पहिल्या षटकात बाद झाला. तर रोहित व श्रेयस अय्यर दुसऱ्या षटकात तंबूत परतले. या तिघांना देखील आपले खाते खोलता आले नाही. त्यावेळी भारतीय संघाची धावसंख्या केवळ दोन होती.
त्यानंतर विराट कोहली व राहुल यांनी भारताचा डाव हळूहळू पुढे नेला. विराटने बारा धावांवर मिळालेल्या जीवदानाचा योग्य फायदा घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच राहुलने देखील संयम दाखवत अर्धशतकी मजल मारली.
(Virat Kohli And KL Complete 50 Each Against Australia After Bad Start In World Cup)
महत्वाच्या बातम्या –
भारताची धसमुसळी सुरुवात! रोहित-ईशान आणि श्रेयस खातेही न खोलता तंबूत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेच्या वाट्याला अजून एक दुःख, आयसीसीच्या कावाईचा करावा लागणार सामना