ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज पंच सायमन टॉफेल यांनी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. टॉफेल यांनी अंपायरिंगचा नवीन ऑनलाईन कोर्स सुरू केला आहे. त्यांच्या मते विराट आणि अश्विन खूप चांगले पंच बनू शकतात. यामगाचे कारण देखील त्यांनी सांगितले आहे.
अनेकांना वाटते की, पंचाचे काम हे एक बोरिंग काम आहे आणि यामध्ये पाहिजे तेवढा पैसा देखील मिळत नाही. मात्र, सायमन टॉफेल (Simon Taufel) यांना मात्र असे वाटत नाही. त्यांच्या मते भारतीय दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांच्याकडे पंच बनण्यासाठी आवश्यक गुणवत्ता आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “पंचाचे काम आजिबात कंटाळावाणे नाहीये. जोपर्यंत तुम्ही खूप कोरड्या जागेवर म्हणजेच कराची किंवा अशाचप्रकारच्या इतर कोणत्या ठिकाणी पंचाचे काम करत असाल, खेळपट्टीवर काहीच हालचाल होत नसेल, तेव्हा हे काम थोडे कंटाळवाणे होते. तुम्हाला माहिती आहे पंचाचे काम खूप आव्हानात्मक आहे. लोकं म्हणतात तुम्ही एवढा वेळ कसे काय लक्ष केंद्रित करता? तर उत्तर हे आहे की, आम्ही फक्त स्टंप्सकडे पाहत असतो. या कामात खूप सन्मान आणि पैसा आहे.”
टॉफेल यांनी पुढे कोणकोणते खेळाडू पंच बनू शकतात याविषयी खुलासा केला. ते म्हणाले की, “जर तुम्हाला पंच बनायचे आहे, तर त्यासाठी व्यक्तिमत्व आणि इच्छा असावी लागते. मी मॉर्ने मॉर्केलसोबत बोललो होतो आणि तो हे काम करण्यासाठी इच्छुक होता, पण हे प्रत्येकाला जमणारे काम नाहीये. मी विरेंद्र सेहवाग, किंवा विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनला पंचाच्या रूपात पाहू इच्छितो. या सर्वांना निमयांची चांगली जाण आहे.”
दरम्यान, सायमन टॉफेल यांनी आयसीसी क्रिकेट अकादमीच्या सहयोगाने एक ऑनलाईन अंपायरिंग कोर्स सुरू केला आहे. हा कोर्स तीन स्तरांवर आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कोर्स सर्वांसाठी आहे, जे आधीपासून पंचाची भूमिका पार पाडत आहे आणि जे नव्याने हे क्षेत्रात उतरू इच्छितात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘नेक्स्ट विराट’ मानला गेलेल्या उन्मुक्त चंदचं नक्की चुकलं काय? वाचा त्याच्या प्रवासाबद्दल
विराटच्या आयपीएल २०२२मधील सरासरी प्रदर्शनावर हताश नाही दिग्गज फलंदाज, कारणही केले स्पष्ट
‘खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या रोहित-विराटला आरामाची गरज’, श्रीलंकेच्या दिग्गजाने मांडले मत