इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय खेळाडूंच्या पहिल्या गटाने लंडनला पोहोचल्यानंतर सराव सुरू केला आहे. कर्णधार रोहित शर्माही संघात सामील झाला आहे. वैयक्तिक कारणांमुळे उर्वरित खेळाडूंनंतर एका दिवसानंतर त्याने लंडनला जाणारे विमान पकडले होते. टीम इंडियाला २४ जूनपासून लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. या सामन्याच्या तयारीच्या दरम्यान, रोहित आणि विराटला मोकळा वेळ मिळाल्यावर ते लंडनमध्ये खरेदीसाठी बाहेर पडले आणि चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहताच त्यांच्यात सेल्फी काढण्याची स्पर्धा लागली. कोहली आणि रोहितनेही चाहत्यांना निराश केले नाही.
Cute little fans clicked picture with Virat Kohli in the Yesterday's practice sessions. pic.twitter.com/s1ykePyxTX
— Tanuj Singh (@ImTanujSingh) June 19, 2022
टीम इंडियाला २४ जूनपासून लीसेस्टरशायरविरुद्ध ४ दिवसांचा सराव सामना खेळायचा आहे. यासाठी भारतीय संघानेही लॉर्ड्सवर तयारी सुरू केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली काही खेळाडू गुरुवारी लंडनला पोहोचले तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा एका दिवसानंतर म्हणजे शुक्रवारी इंग्लंडला पोहोचले. तो संघात सामील झाला आहे. दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघेही लंडनमध्ये खरेदी करताना दिसत आहेत आणि यादरम्यान या दोन्ही खेळाडूंनी चाहत्यांसोबत सेल्फीही काढल्या आहेत.
Captain Rohit Sharma With His Fans ❤️
📸 @ImRo45 pic.twitter.com/kG6a2hWhO5
— MI Fans Army™ (@MIFansArmy) June 19, 2022
एक चाहता बाकीच्यांपेक्षा जास्त भाग्यवान होता. विराट कोहलीसोबत त्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मासोबत सेल्फी घेण्याची संधी मिळाली.
A fan clicked picture with both Virat Kohli and Rohit Sharma in London. pic.twitter.com/ozdhIHo8lH
— Tanuj Singh (@ImTanujSingh) June 19, 2022
विराट कोहलीने शुक्रवारीच लॉर्ड्सवर संघासोबत सरावाला सुरुवात केली. टीम इंडियाच्या ट्रेनिंग सेशनसाठी बरेच चाहतेही पोहोचले होते. संघाचे प्रशिक्षण संपल्यानंतर विराट हॉटेलमध्ये परतत असताना काही मुलांनी त्याला सेल्फी काढण्याची विनंती केली. कोहलीने त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासही नकार दिला नाही. लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यानंतर टीम इंडिया १ जुलैला इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे.
दरम्यान, भारताच्या शेवटच्या इंग्लंड दौऱ्यावर कोरोनामुळे मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी रद्द करावी लागली होती. २०२२ मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात ही एकमेव कसोटी खेळली जाईल, असे त्यावेळी ठरले होते. त्यामुळे या दौऱ्यावर दोन्ही संघांदरम्यान १ कसोटी सामना खेळवला जात आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. एकमेव कसोटीनंतर भारताला इंग्लंडकडून तीन टी२० आणि तितक्याच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. दोन्ही देशांमधला पहिला टी२० सामना ७ जुलै रोजी साउथॅम्प्टन येथे खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, पुढील दोन सामने बर्मिंगहॅम आणि नॉटिंगहॅममध्ये खेळवले जातील. यानंतर १२ जुलैपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. शेवटचा वनडे १७ जुलै रोजी मँचेस्टरमध्ये खेळवला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इशान की प्रियांक? विराटसोबत धावत असलेला व्यक्ती कोण? सराव सत्रातील फोटोने गोंधळले चाहते
INDvsSA | कर्णधार म्हणून कोहली, धोनीकडूनही जे नाही झाले; ते करत इतिहास रचणार रिषभ पंत
मुंबई-मध्य प्रदेशमध्ये रंगणार रणजी ट्रॉफीची फायनल, जाणून घ्या आजवरचे विजेता-उपविजेता एका क्लिकवर