मागील महिन्यात 5 ऑक्टोबर रोजी सुरू झालेला क्रिकेटचा महाकुंभमेळा अर्थातच आयसीसी वनडे विश्वचषक 2023 अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेचे 45 साखळी सामने पार पडले आहेत. त्यानंतर आता उपांत्य फेरीत भारत विरुद्ध न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असे सामने होतील. या उपांत्य सामन्यात व त्यानंतर अंतिम सामन्यात प्रवेश केल्यास भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली व कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडे एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.
विराट व रोहित यांच्याकडे उपांत्य सामन्यात एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी असेल. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने 2003 विश्वचषकात एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बनवला होता. त्यामुळे सचिन 11 सामने खेळताना 61.18 च्या सरासरीने तब्बल 673 धावा केल्या होत्या.
रोहितने या विश्वचषकात 9 सामन्यात फलंदाजी करताना 55.88च्या सरासरीने 503 धावा केल्या आहेत. रोहितने या धावा करताना 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे. त्याला सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी दोन सामन्यात 171 धावा कराव्या लागतील.
तर दुसऱ्या बाजूने विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली देखील हा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे आहे. त्याने 9 सामन्यात 99 च्या सरासरीने सर्वाधिक 594 धावा केल्या आहेत. विराटने या धावा करताना 2 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. विराटला हा विक्रम ओढण्यासाठी केवळ 80 धावांची आवश्यकता आहे.
भारतीय संघ आपला उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंड विरुद्ध 15 नोव्हेंबर रोजी खेळेल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.
(Virat Kohli And Rohit Sharma Have Chance To Break Sachin Tendulkar Record As Most Runs In ODI World Cup Edition)
हेही वाचा-
IND vs NZ सेमीफायनलपूर्वी आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणतो, ‘ही तर फक्त एक दिवसाची…’
‘मान्य करावंच लागेल, सेमीफायनलमध्ये दबाव…’, कोच द्रविडचे न्यूझीलंडशी भिडण्यापूर्वी मोठे विधान