भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा दिल्लीच्या खाद्यपदार्थांचा मोठा शौकीन आहे. ही गोष्ट तो अनेकदा सार्वजनिकरित्या सांगताना देखील दिसतो. या कारणास्तव त्याने क्रिकेटसोबतच रेस्टॉरंट चेन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. विराट ‘वन 8 कम्यून’ नावाचे रेस्टॉरंट चालवतो. या नावाने त्याचे बंगळुरू, दिल्ली, कोलकाता आणि इतर अनेक ठिकाणी या रेस्टॉरंटचे अनेक आऊटलेट्स देखील आहेत. आता या यादीत मोहालीचेही नाव जोडले गेले आहे. खुद्द कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन रेस्टॉरंट वन 8 कम्यूनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने मोहालीमध्ये बनवलेले त्याचे नवीन रेस्टॉरंट दाखवले. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पंजाब, तुम्ही यासाठी तयार आहात का? माझ्या हृदयात एक विशेष स्थान असलेले शहर मोहाली येथे आमचे 10 वे वन 8 कम्युन आउटलेट सुरू करताना मला अधिक आनंद झाला. माझ्यासाठी, वन 8 कम्यून हे फक्त एक हँगआउट स्पॉट नाही, ते एक ठिकाण आहे जिथे कथा शेअर केल्या जातात. मैत्री निर्माण होते. वन 8 कम्यून अनुभवाचा आनंद घेण्यासाठी मी तुमची वाट पाहतोय.’
View this post on Instagram
मोहाली येथील हे नवे आउटलेट अतिशय नेत्रदीपक आहे. त्याची रचना अतिशय चपखलपणे करण्यात आली असून, सर्व गोष्टी खास पद्धतीने व्यवस्थित ठेवलेल्या दिसत आहेत. विराट त्याचा मोठा भाऊ विकास कोहलीसोबत हा व्यवसाय चालवतो. विकास आणि विराट अनेक वर्षांपासून व्यावसायिक भागीदार आहेत. याआधी विराटने गुरुग्राम आणि हैदराबाद सारख्या ठिकाणी त्याच्या रेस्टॉरंटचे आउटलेटही उघडले होते. या व्यतिरिक्त विराटचे वन 8 स्पोर्ट्स व रॉंग हे दोन ब्रँड देखील आहेत. तसेच अनेक व्यवसायात देखील त्याची गुंतवणूक आहे.
हेही वाचा –
आश्चर्यकारक! स्टंपला चेंडू लागला तरीही फलंदाज बाद नाही, पाहा VIDEO
धाडसी फलंदाज, भारताच्या मधल्या फळीचा कणा! 1983 वर्ल्डकप विजयाच्या हिरोचा आज वाढदिवस
काय सांगता! धोनीनं केली 15 कोटी रुपयांची फसवणूक? बीसीसीआयनं उत्तर मागितलं