केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजांनी नाटकीय पद्धतीने विकेट्स गमावल्या. दक्षिण आफ्रिका 55, तर भारताने पहिल्या डावात 153 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. परिणामी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेला दोन वेळा फलंदाजीची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डीन एल्गर आता पुन्हा कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना दिसणार नाही. याच पार्श्वभूमीवर विराट कोहली याने मैदानात दाखवलेला दिलदारपणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
भारतीय संघाने पहिला डाव संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर 98 धावांची आघाडी मिळावली होती. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात दक्षिण आफ्रिका संघ दुसऱ्यांदा फलंदाजीला आला. सलामी फलंदाज डीन एल्गर याच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही शेवटची खेळी होती. पण अवघ्या 12 धावा केल्यानंतर मुकेश कुमार याने एल्गरला विराट कोहली याच्या हातात झेलबाद केले. भारतासाठी डावातील ही पहिलीच विकेट असल्यामुळे मुकेश या विकेटनंतर जल्लोष करू लागला होता. पण विराटने झेल घेतल्यानंतर लगेच सर्वांना जल्लोष न करता एल्गरला सन्मानपूर्वक निरोप देण्याच्या सुचनाच केल्या. विराटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विराटच्या या खेळाडू वृत्ती आणि दिलदारपणासाठी सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
Virat Kohli bowing down to Dean Elgar after his final Test innings.
– King Kohli, truly an ambassador of the game…!!! 🐐pic.twitter.com/TSLpqAaG1P
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 3, 2024
दरम्यान, एल्गरच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आफ्रिकी संघाला महत्वाचे योगदान दिले. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 86 कसोटी सामने खेळले असून यात 5347 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 14 शतकेही निघाली. एल्गर दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटी कर्णधार देखील राहिली. नियमित कर्णधार टेम्बा बावुमा संघातून बाहेर असल्यामुळे त्याला शेवटच्या कसोटी सामन्यात नेतृत्वाची संधी मिळाली.
अभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या डावात भारतासाठी मोहम्मद सिराज याने 9 षटकात 15 धावा दिल्यानंतर सर्वाधिक 6 विकेट्स नावावर केल्या. परिणाम अवघ्या 55 धावांवर यजमानांचा डाव गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारतीय संघआने 4 विकेट्सच्या नुकसानावर 153 धावा केल्या होत्या. पण पुढच्या सहा विकेट्स संघाने अवघ्या दोन षटकात गमावल्या. यादरम्यान एकाही फलंदाजाला संघासाठी एक धाव देखील करता आली नाही. कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी शेवटच्या दोन षटकांमध्ये प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. भारतासाठी पहिल्या डावात रोहित शर्मा 39, शुबमन गिल 36, तर विराट कोहली 46 धावा करून बाद झाले.
केपटाऊन कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, लुंगी एलगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
महत्वाच्या बातम्या –
संपुर्ण वेळापत्रक: प्रत्यक्ष मैदानात जाऊन मॅचेस पाहण्याची संधी, 2024मध्ये ‘इंडिया’ खेळणार तुफान सामने
SA vs IND । यान्सेनच्या विकेटचं श्रेय सिराजइतकंच विराटला! माजी कर्णधाराचा अनुभव आला कामी, पाहा व्हिडिओ