---Advertisement---

“हार्दिकने गोलंदाजी केली नाही, तरी तो मॅन विनर”, विराटचे टीकाकारांना प्रत्युत्तर

On: शनिवार, ऑक्टोबर 23, 2021 8:20 PM
---Advertisement---

टी -२० विश्वचषकामध्ये रविवार (२४ ऑक्टोबर) पासून भारत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होईल. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. यातच हार्दिक पंड्याचा खेळण्याबाबतच्या चर्चांना आता जवळ जवळ पूर्णविराम भेटला आहे.

हार्दिक पंड्या आता पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. मात्र यावेळी तो संघात अष्टपैलू म्हणून नाही, तर फलंदाज म्हणून खेळणार आहे.

कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वी म्हटले आहे की, हार्दिकने गोलंदाजी केली किंवा नाही केली, तरी तो भारतीय संघाचा ‘मॅच विनर’ खेळाडू आहे. हार्दिक पंड्याने २०१९ पासून पाठीच्या दुखापतीमूळे गोलंदाजी केलेली नाही. यावेळी तर त्याने आयपीएलमध्येही त्याने गोलंदाजी केली नाही. हार्दिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार की नाही, याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आता विराटने हे सर्व प्रश्न फेटाळून लावले आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत विराटने हार्दिकचे जोरदार कौतुक केले. तो म्हणाला, ‘आम्ही सहाव्या क्रमांकाचा फलंदाज एका रात्रीत तयार करू शकत नाही. मी नेहमीच पंड्याला पाठिंबा देत आलो आहे. त्याने ऑस्ट्रेलियात कशी कामगिरी केली ते तुम्ही पाहिले आहे. मी त्याला फलंदाज म्हणून संघात ठेवले आहे. तो असा फलंदाज आहे जो प्रतिस्पर्ध्याकडून सामना हिरावून घेऊ शकतो. तो आमचा ‘मॅच विनर’ खेळाडू आहे. टी२० सामन्यामध्ये अशा फलंदाजांची गरज असते.’

विराट कोहली म्हणाला की, पंड्या आता फिटनेसच्या बाबतीत आता चांगला होत आहे. तो लवकरच गोलंदाजीही करेल, अशी आशा विराटने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘मला वाटते की स्पर्धेत तो पुढच्या टप्प्यावर किमान दोन षटके नक्कीच गोलंदाजी करेल. पण आत्ता तो गोलंदाजी करू शकत नाहीत, त्यासाठी आम्ही त्याच्यावर दबाव आणू शकत नाही.’

दोन दिवसांपूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि २००७ च्या टी -२० विजेत्या संघाचा सदस्य गौतम गंभीरने पंड्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबत एक अट घातली होती. जर हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार असेल तरच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले पाहिजे, असे त्याने म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘भारत विजेतेपदाचा दावेदार असला, तरी प्रबळ दावेदार नाही’, माजी इंग्लिश कर्णधाराचे वक्तव्य

कांगारूंचा विजयाने श्रीगणेशा; अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय

भारत-पाकिस्तान सामन्यांत आत्तापर्यंत कुणाचे वर्चस्व, आकडे देतात धक्कादायक माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---