ऍडलेड येथे चालू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस अत्यंत रोमांचक राहिला. या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी मिळून भारतीय संघाला फक्त ३६ धावांवर गारद केले. त्यामुळे दुसऱ्या डावात विजयासाठी ऑस्ट्रेलिया संघाला फक्त ९० धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान पूर्ण करत ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने विजय मिळवला. यादरम्यान यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने विकेट्सचा मोठा टप्पा ओलांडला.
विराट ठरला कमिन्सची १५०वी कसोटी विकेट
ऑस्ट्रेलियाचा २७ वर्षीय वेगवान गोलंदाज कमिन्सने २०११ साली दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर कारकिर्दीतील अनेक चढ-उतारांमुळे कमिन्समुळे अधिक कसोटी सामने खेळायला मिळाले नाहीत. भारताविरुद्धचा दिवस- रात्र कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील ३१वा कसोटी सामना होता. या सामन्यापूर्वी त्याने कसोटीत १४३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे १५० धावांचा आकडा गाठण्यासाठी त्याला ७ विकेट्सची गरज होती.
या कसोटी सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या डावात ४ भारतीय फलंदाजांना बाद करत कमिन्सने १५० विकेट्स पूर्ण केल्या. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा कमिन्सच्या अविस्मरणीय विक्रमाचा भाग ठरला. सोबतच संघसहकारी कॅमरॉन ग्रीननेही कमिन्सला मोलाची साथ दिली.
कॅमरॉन ग्रीनने घेतला विराटचा भन्नाट झेल
झाले असे की, भारताचा दुसरा डाव चालू असताना कमिन्सने पृथ्वी शॉ, जसप्रीत बुमराह आणि चेतेश्वर पुजारा यांना बाद केले. त्यानंतर तो आपल्या १५०व्या शिकाराची वाट पाहात होता. कर्णधार टीम पेनने डावातील १४वे षटक कमिन्सकडे सोपवले. या षटकातील पहिले दोन चेंडू निर्धाव गेले. पण तिसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाजी करत असलेल्या विराटने जोरदार चौकार लगावला. त्यानंतर विराट पुढील चेंडूवर हलकासा शॉट मारत एक किंवा दोन धावा खेचून घेण्याच्या प्रयत्नात होता. पण कॅमरॉन ग्रीनने दोन्ही हातांनी चेंडू पकडत विराटला झेलबाद केले. अशाप्रकारे विराट कमिन्सची कसोटी क्रिकेटमधील १५०वी विकेट ठरला.
INCREDIBLE!
Cameron Green juggles in the gully, Virat Kohli has to go after the umpires check the catch and it's 6/19!
What an unbelievable passage of play this is #AUSvIND pic.twitter.com/8WN9k4EGpk
— 7Cricket (@7Cricket) December 19, 2020
Cameron Green did well to hold on here!
Absolute scenes as Pat Cummins also celebrates his 150th Test wicket.#AUSvIND | @hcltech pic.twitter.com/PQscMWsdIz
— cricket.com.au (@cricketcomau) December 19, 2020
Cameron Green takes a ripper at gully and Virat Kohli is on his way. India are 6/19! #AUSvIND
Follow the action LIVE: https://t.co/fwLQSNNnCG pic.twitter.com/9D8ei1aTBl
— News Cricket (@NewsCorpCricket) December 19, 2020
सर्वात जलद १५० कसोटी विकेट्स घेणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज
यासह कमिन्स कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट्सचा टप्पा गाठणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या यादीत सहभागी झाला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियन दिग्गज क्लॅरी ग्रीमेट अव्वलस्थानी आहेत. त्यांनी केवळ २८ कसोटी सामन्यात हा पराक्रम केला होता. कमिन्स डेनिस लीली, शेन वॉर्न, स्टुअर्ट मॅकगिल यांच्यासह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.
कसोटीत सर्वात जलद १५० विकेट्स घेणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज-
२८ सामने- क्लॅरी ग्रीमेट
३१ सामने- डेनिस लीली, शेन वॉर्न, स्टुअर्ट मॅकगिल, पॅट कमिन्स*
३४ सामने- ग्रॅहम मॅकेन्झी, जेफ थॉमसन, ग्लेन मॅकग्रा, मिचेल जॉनसन
३५ सामने- बिल जॉनसन, क्रेग मॅकडर्मोट
३६ सामने- टेरी अल्डरमन
महत्त्वाच्या बातम्या-
हाउज द जोश..!! भारतीय फलंदाजांना लोळवणाऱ्या हेजलवूडने केलाय ‘हा’ मोठा पराक्रम
‘हे’ आकडे एकदा पाहा… संपूर्ण जग २०२० ला विसरेल पण भारत नाही विसरणार
तीन बदक आणि लाजीरवाणा पराक्रम..! पाहा दुसऱ्या डावातील भारतीय फलंदाजांची सुमार कामगिरी