---Advertisement---

… आणि विराटचा ‘तो’ निर्णय ठरला ऐतिहासिक

On: मंगळवार, ऑगस्ट 17, 2021 6:18 PM
---Advertisement---

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत इंग्लंड संघाला १५१ धावांनी पराभूत केले. यासह भारताने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. त्याच वेळी या संस्मरणीय विजयात एक अशी कामगिरी भारतीय कर्णधार विराट कोहलीने केली जी यापूर्वी कधीच केली नव्हती.

प्रथमच घडली अशी घटना
भारतीय क्रिकेट संघ सन १९३२ पासून लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळत आहे. भारताने आजवर या मैदानावर १९ कसोटी सामने खेळले असून, ते परदेशातील कोणत्याही मैदानावरील सर्वाधिक आहेत. त्यामध्ये केवळ तीन सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले. या दरम्यान सोमवारी संपन्न झालेल्या सामन्यात एक अशी घटना घडली, जी या ८९ वर्षात यापूर्वी कधीही घडली नव्हती.

भारताने पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपला दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित केलेला. ८९ वर्षांच्या व १९ सामन्यांच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने प्रथमच हा कारनामा केला आहे. यापूर्वी भारताने या मैदानावर कधीही आपला डाव घोषित केला नव्हता. नवव्या गड्यासाठी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी नाबाद ८९ धावा जोडून ही कामगिरी साध्य केली.

भारताची मालिकेत आघाडी
विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्स कसोटीच्या अखेरच्या दिवशी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. अखेरच्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. मात्र, बुमराह व शमी यांच्या नाबाद भागीदारीमूळे भारताने सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर, वेगवान गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे भारतीय संघाने ६० षटकात इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळून १५१ धावांनी संस्मरणीय विजय मिळवला. मालिकेतील तिसरा सामना २५ ऑगस्टपासून खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

लॉर्ड्सवरील संस्मरणीय विजयानंतर विराटला झाली धोनीची आठवण, म्हणाला…

लॉर्ड्स मोहिम फत्ते करणाऱ्या सर्व ११ शिलेदारांच्या प्रतिक्रिया, वाचा सविस्तर

विजयाचा आनंद! लॉर्ड्स कसोटीत विजय मिळवल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये भारतीय संघाने ‘असा’ साजरा केला जल्लोष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---