तब्बल चार वर्षानंतर होत असलेल्या आशिया चषकाला दुबई येथे सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. दोन्ही संघ टी20 विश्वचषकानंतर प्रथमच आमने-सामने येत आहेत. या सामन्यात मैदानावर उतरताच भारताचा माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज विराट कोहली याने भारतीय क्रिकेटमधील एक एकमेवाद्वितीय कामगिरी आपल्या नावे केली.
भारत पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना सुरू होताच सर्वांची नजर विराट कोहली याच्यावर होती. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विराट कोहलीला देखील संघात स्थान मिळाले. विराटने मैदानात पाऊल ठेवताच भारतीय क्रिकेटमधील एक मैलाचा दगड पार केला. विराटने या सामन्यात उतरताना भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम केला. यापूर्वी केवळ न्यूझीलंडच्या रॉस टेलर याला कामगिरी करता आली होती. विराटने आत्तापर्यंत भारतासाठी 102 कसोटी, 262 वनडे व 100 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
First #TeamIndia player to play 💯 matches across formats 🔝
Go well, @imVkohli 👏👏#AsiaCup2022 | #INDvPAK pic.twitter.com/QkJbaDwEFS
— BCCI (@BCCI) August 28, 2022
भारतासाठी आतापर्यंत 35 क्रिकेटपटूंनी 100 किंवा 150 पेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत. तर, 12 खेळाडूंना भारतासाठी 100 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी खेळण्याचे सौभाग्य लाभले आहे. टी20 चा विचार केला तर, विराटआधी केवळ रोहित शर्मा याने 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
विराट कोहली मागील काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर त्याने कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळले नाही. या आशिया चषकात चांगली कामगिरी करण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल. भारताला आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलिया दौरा करत, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IND vs PAK | रिषभ पंत महत्वाच्या सामन्याला मुकला! कर्णधार रोहितने दिले स्पष्टीकरण
Breaking: भारताच्या पेपरात ‘आऊट ऑफ सिलॅबस क्वेश्चन!’ पाकिस्तानचा ‘हा’ गोलंदाज करतोय पदार्पण
‘पिक्चर अभी बाकी है!’ पहिला सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे खास संकेत