---Advertisement---

किंग कोहलीचे नाव आता या ६ दिग्गज कर्णधारांच्या यादीत सन्मानाने घेतले जाणार!

---Advertisement---

पुणे। भारताने शुक्रवारी(10 जानेवारी) श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात 78 धावांनी विजय मिळवला आणि 3 सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने जिंकली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे येथे पार पडलेला हा सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठीही खास ठरला.

त्याने या सामन्यात 2 चौकार आणि 1 षटकारासह 17 चेंडूत 26 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 11000 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला.

हा टप्पा पार करणारा तो जगातील एकूण सहावा तर भारताचा एमएस धोनी नंतरचा दुसराच कर्णधार ठरला आहे. विराटच्या आधी केवळ रिकी पाँटिंग, ग्रॅमी स्मिथ, स्टीफन फ्लेमिंग, धोनी आणि ऍलन बॉर्डर यांनाच कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11000 धावांचा टप्पा पार करता आला आहे.

विराटच्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 169 सामन्यांतील 196 डावात 66.81 च्या सरासरीने 11025 धावा झाल्या आहेत.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 11000 धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने हा पराक्रम करताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. पाँटिंगने कर्णधार म्हणून 11000 धावांचा टप्पा 252 डावात पार केला होता.

#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-

15440 धावा – रिकी पाँटिंग

14878 धावा – ग्रॅमी स्मिथ

11561 धावा – स्टीफन फ्लेमिंग

11207 धावा – एमएस धोनी

11062 धावा- ऍलन बॉर्डर

11025 धावा – विराट कोहली

#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 11000 धावा करणारे क्रिकेटपटू –

196 डाव – विराट कोहली

252 डाव – रिकी पाँटिंग

265 डाव – ग्रॅमी स्मिथ

324 डाव – एमएस धोनी

316 डाव – ऍलेन बॉर्डर

333 डाव – स्टिफन फ्लेमिंग

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---