---Advertisement---

किंग कोहली बनला असा भीमपराक्रम करणारा पहिलाच आशियाई फलंदाज

On: रविवार, डिसेंबर 16, 2018 11:06 AM
---Advertisement---

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत  संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु असून या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे. त्याबरोबरच कोहलीने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.

विराटने आज 257 चेंडूत 123 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटने 214 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले असून हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 25 वे शतक आहे.

याबरोबरच 2018 या वर्षात त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि आता आॅस्ट्रेलियातही कसोटी शतक केले आहे. त्यामुळे तो एकाच वर्षात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या देशात कसोटीमध्ये शतके करणारा पहिला आशियाई फलंदाज बनला आहे.

त्याने यावर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक शतक केले होते. त्यानंतर त्याने आॅगस्टमध्ये इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2 शतके केली होती.

तसेच आॅस्ट्रेलिया विरुद्धचा अॅडलेड येथे पार पडलेला पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर विराट हा एकाच वर्षात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या देशात कसोटी सामना जिंकणाराही पहिला आशियाई कर्णधार ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..

कोहली आणि रहाणेच्या खेळीचे ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूंनी केले कौतुक

कर्णधार कोहलीने स्मिथचा तर विक्रम मोडलाच पण पॉटिंगचाही विक्रम आहे धोक्यात

रनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम

मी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment