टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रविवारी ( 13 नोव्हेंबर) खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. या सामन्यामुळे मात्र भारताच्या एका खेळाडूच्या नावावर टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील मोठ्या विक्रमाची नोंद झाली.
भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा जेव्हा धावा करतो तेव्हा तो विक्रमांची रांग लावतो. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आठव्या टी20 विश्वचषकातही त्याने अशीच कमाल केली आहे. तो टी20 विश्वचषकाच्या दोन हंगामांमध्ये सर्वाधिक धावा करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याने ही कामगिरी 2014 आणि 2022च्या आवृत्तीत केली आहे.
विराटने 2014 च्या टी20 विश्वचषकात 6 सामन्यात 106.33 च्या सरासरीने 319 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 4 अर्धशतके, 24 चौकार आणि 10 षटकार मारले होते. त्यावेळी त्याचा त्या स्पर्धेतील सर्वोत्त वैयक्तिक धावसंख्या 77 होती. 2022 च्या हंगामातही त्याने 6 सामन्यात खेळताना 4 अर्धशतकांच्या सहाय्याने 296 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याची सरासरी 98.67 राहिली. तसेच त्याने 25 चौकार आणि 8 षटकार खेचले होते.
टी20 विश्वचषकामध्ये 2012 ते 2022च्या दरम्यान 27 सामन्यांच्या 25 डावांमध्ये खेळताना 81.50च्या सरासरीने 1141 धावा केल्या. त्याने 2022च्या विश्वचषकातच हजार धावांचा टप्पा गाठला आणि श्रीलंकेच्या माहिला जयवर्धने याचा विक्रम मोडला. टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत जयवर्धने 1016 धावा करत दुसऱ्या स्थानावर आहे, मात्र त्यासाठी त्याने 31 सामने खेळले. या स्पर्धेत त्यांनी अनेक विक्रमे आपल्या नावावर केली, ज्याच्या आसपासही कोणी नाही.
त्याचबरोबर टी20 विश्वचषकामध्ये सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही विराटच अव्वल आहे. त्याने 14 अर्धशतके केली. या यादीत त्याच्या आसपासही कोणीच नाही, कारण दुसऱ्या स्थानावर विराटचाच संघसहकारी आहे. रोहित शर्मा (Rohit Sharama) याने टी20 विश्वचषकात 2007पासून ते 2022 पर्यंत 9 अर्धशतके केली. Virat Kohli becomes the FIRST player to be the leading run-scorer in multiple T20 World Cups (2014, 2022)
टी20 विश्वचषकात सर्वाधिक मालिकावीराचे पुरस्कार कोण जिंकले असतील तर अर्थातच नाव पुढे येते विराटचे. त्याने 2014 आणि 2016च्या हंगामात मालिकावीर ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फायनल सम्राट! इरफानचा 15 वर्ष जुना विक्रम मोडत करनने रचला इतिहास
वेगाचा ‘बादशाह’ शाहीन आफ्रिदीच! टी20 वर्ल्डकपच्या नॉक-आऊट सामन्यांमध्ये ठरतोय फलंदाजांचा कर्दनकाळ