---Advertisement---

जेव्हा सर्वात मोठा प्रतिस्पर्धीच करतो विराट कोहलीचे कौतुक…

---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ यांची तुलना क्रिकेट जगतासाठी नवीन नाही. या क्रिकेटपटूंमध्ये नेहमीच तुलना केली जाते आणि सध्याच्या घडीला या दोघांना एकमेकांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी मानले जाते. तसे पाहिले तर या दोन क्रिकेटपटूंमधील संबंधही फारसे मैत्रीपूर्ण राहिलेले नाही. पण असे असले तरी स्टिव्ह स्मिथने विराटचे कौतुक करताना त्याला सध्याचा सर्वोत्तम वनडे फलंदाज म्हटले आहे.

स्मिथने बुधवारी मँचेस्टरला प्रवास करत असताना कंटाळा आल्याने इंस्टाग्राम स्टोरीवर प्रश्न-उत्तराचे सत्र घेतले होते. यावेळी त्याला त्याच्या चाहत्याकडून प्रश्न विचारण्यात आला की ‘तूला जगातील सर्वोत्तम वनडे फलंदाज कोण वाटतो?’

या प्रश्नाचे उत्तर देताना स्मिथने लिहिले की ‘सध्याच्या घडीला विराट कोहली.’

Screengrab: Instagram/Steve Smith

याव्यतिरिक्त स्मिथला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याला केएल राहुल आणि संजू सॅमसनबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्याने केएल राहुलला ‘गन’ म्हटले तर सॅमसनबद्दल तो म्हणाला, तो प्रतिभाशाली आहे.

तसेच या प्रश्न-उत्तर सत्रादरम्यान स्मिथने असेही सांगितले की त्याला कसोटी क्रिकेट प्रकार आवडतो. तसेच त्याने ४ वर्षांचा असतानाच त्याने ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळायचे हे ठरवले होते.

स्मिथ सध्या इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच टी२० मालिका पार पडली. या मालिकेत इंग्लंडने २-१ ने विजय मिळवला. आता या दोन संघात ११ सप्टेंबरपासून वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेनंतर स्मिथसह अन्य ऑस्ट्रेलिया तसेच इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी युएईला पोहचतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

या माजी कर्णधाराला ‘तो’ सामना खेळण्यात वाटत होती भीती; प्रशिक्षकाचा खुलासा

विराट कोहली बाबर आझमला मागे टाकत टी२०मध्ये या धडाकेबाज खेळाडूची अव्वल स्थानी झेप

या दिग्गजाने निवडला चेन्नई सुपर किंग्सचा प्लेइंग “११”; पहा धोनी,जडेजासह कोणाला मिळाले स्थान

ट्रेंडिंग लेख –

असे ४ क्रिकेटर जे परदेशात जन्मले पण खेळले भारतासाठी क्रिकेट खेळले

गोलंदाजी, फलंदाजी, म्हणाल तिथे क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षणसुद्धा करणारा खराखुरा ऑलराऊंडर

…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---