भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली आणि इशान किशन यांनी जबरदस्त प्रदर्शन केले. इशानने झंजावाती खेळ दाखवत द्विशतक पूर्ण केले. तर विराट देखील तब्बल तीन वर्षांच्या काळानंतर वनडे फॉरमॅटमध्ये शतक करू शकला. या दोघांच्या योगदानामुळे भारताची धावसंख्या 400 पार गेलीच, पण विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठा विक्रम देखील नोंदवला गेला.
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज आणि कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) या विराटच्या या शतकीय खेळीमुळे नुकसान सोसावे लागेल आहे. विराट कोहली (Virat Kohli) याने आशिया चषक 2022 मध्ये त्याच्या कारकिर्दीतील 71 वे शतक केले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकांचा दुष्काळ संपवून विराटने पाँटिंगची बरोबरी केली होती. मागच्या काही महिन्यांपासून विरटा आणि पाँटिंग या दोघांच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी 71 शतकांची नोंद होती. मात्र, शनिवारी (10 डिसेंबर) विराटने या दोघांना मागेट टाकत यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहेत. सचिनने त्याच्या मोठ्या कारकिर्दीत 100 आंतरराष्ट्रीय शतके कोली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर – 100
विराट कोहली – 72*
रिकी पाँटिंग – 71
दरम्यान, उभय संघातील या वनडे सामन्याचा विचार केला, तर भारतासाठी इशान किशन (Virat Kohli) याने सर्वाधिक 210 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमधील हे त्याचे पहिले शतक आणि द्विशतक ठरले. त्याने अवघ्या 126 चेंडूत स्वतःचे द्विशतक पूर्ण केले असून सर्वात वेगवान वनडे द्विशतक करणारा फलंदाज देखील ठरला. विराटने शतक पूर्ण करण्यासाठी 85 चेंडू घेतले. त्याने या सामन्यात एकूण 91 चेंडू खेळले असून 113 धावा केल्या. या दोघांच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने या सामन्यात 8 बाद 409 धावा कुटल्या. उभय संघांतील या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशने आधिच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. पण तिसऱ्या वनडे सामन्यात इशान किशनने मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवले. (Virat Kohli broke Ricky Ponting’s record by scoring a century against Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वविक्रमवीर ईशान किशन! तिसऱ्या वनडेत ठोकले वादळी द्विशतक
‘त्या’ जाहिरातीमुळे रिषभ पंतवर प्रसिद्ध गायिकेची आगपाखड; म्हणाल्या, ‘तू मूर्खासारखा दिसतोस’