---Advertisement---

चौथ्या कसोटीत एक शतक अन् ‘हा’ विश्वविक्रम होणार विराट कोहलीच्या नावे, वाचा

On: बुधवार, मार्च 3, 2021 9:50 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. अशातच ४ मार्चपासून सुरु होणाऱ्या चौथ्या सामन्यात भारतीय संघासमोर विजयाचे मोठे आव्हान असणार आहे. हा सामना मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहेच, तसेच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या खेळीच्या प्रतीक्षेत असलेल्या विराट कोहलीकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या सामन्यात शतक झळकावून विराट दिग्गज खेळाडूंना मागे टाकू शकतो.

विराट या दशकातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने फलंदाजीमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून तो शतकापासून वंचित राहिला आहे. अशातच ४ मार्च पासून सुरु होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात कोहलीकडे शतक करत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिंगला मागे टाकत विश्वविक्रम करण्याची संधी असेल.

याबाबतीत विराट टाकू शकतो रिकी पाँटिंगला मागे

भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकवण्याचा विक्रम केला आहे. सचिनच्या नावे एकूण १०० शतकं आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतक झळकावले आहेत. त्यांनतर माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग याच्या नावे सर्वाधिक ७१ शतकं आहेत. तसेच कोहलीच्या नावे ७० शतक आहेत.

त्यामुळे चौथ्या सामन्यात शतक करत विराटकडे पाँटिंगच्या ७१ शतकांची बरोबरी करण्याची संधी असेल. तसेच कर्णधार म्हणून विराट आणि पाँटिंगच्या नावे ४१ शतकं आहेत. त्यामुळे जर विराटला पुढील सामन्यात शतक करण्यात यश आले, तर तो पाँटिंगला मागे टाकत सर्वाधिक शतक झळकाण्याचा विश्वविक्रम करू शकतो.

शतकाची प्रतिक्षा काही संपेना

भारतीय कर्णधार विराट कोहली याच्या नावे अनेक शतकं आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्याला शतक झळकवण्यात अपयश आले आहे. त्याने २०१९ मध्ये कोलकाताच्या मैदानावर बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या दिवस रात्र कसोटी सामन्यात शतक केले होते. त्यांनतर त्याला एकही शतक करता आले नाही. त्यामुळे चौथ्या आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामन्यात विराटकडे शतक झळकावून ही प्रतिक्षा संपवण्याची संधी असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

ऐकलंत का! ‘या’ आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या रणरागिनी, ज्यांचा सोशल मीडियावरही बापासारखाच रुबाब

टीम इंडियाची नजर कसोटी मालिका विजयावर, ‘या’ अंतिम ११ खेळाडूंसह उतरेल मैदानावर?

वाढदिवस विशेष: पाकिस्तानचे विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण करणारा इंझमाम-उल-हक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---