---Advertisement---

केवळ २ भारतीयांना जमलेला ‘तो’ विक्रम करण्याची विराट कोहलीला सुवर्णसंधी

On: सोमवार, फेब्रुवारी 10, 2020 5:48 PM
---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। उद्या (11 फेब्रुवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बे ओव्हल येथे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला खास विक्रम करण्याची संधी आहे.

या सामन्यात विराट कोहलीने जर 146 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 हजार धावांचा टप्पा पार करेल. हा टप्पा पार करणारा तो जगातील 8 वा क्रिकेटपटू, तर तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. याआधी सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविड या माजी भारतीय क्रिकेटपटूंनी हा टप्पा पार केला आहे.

विराटने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 413 सामन्यात 56.76 च्या सरासरीने 21,854 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 70 शतकांचा आणि 104 अर्धशतकांचा समावेश आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 664 सामन्यात 48.52 च्या सरासरीने 100 शतके आणि 164 अर्धशतकांसह 34,357 धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू – 

34357 धावा – सचिन तेंडुलकर

28016 धावा – कुमार संगकारा

27483 धावा – रिकी पाँटिंग

25957 धावा – माहेला जयवर्धने

25534 धावा – जॅक कॅलिस

24208 धावा – राहुल द्रविड

22358 धावा – ब्रायन लारा

21854 धावा – विराट कोहली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---