इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारी ट्रेंटब्रिज मैदानावर तिसरा सामना पार पडलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर २०३ धावांनी विजय मिळवला. याबरोबर संघाने मालिकेतील पिछाडी १-२ ने कमी केली.
भारतीय संघ या मालिकेतील पहिला कसोटी सामना केवळ ३१ धावांनी पराभूत झाला होता तर दुसरा सामना १ डाव आणि १५९ धावांनी पराभूत झाला होता. तिसऱ्या सामन्यात कोहलीच्या याच टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली. तब्बल २०३ धावांनी विजय मिळवत मालिकेतील पिछाडी १-२ अशी केली.
आता विराटच्या ह्याच टीम इंडियाला एक खास कारनामा करण्याची मोठी संधी आहे. ०-२ असे पिछाडीवर असुनही मालिका जिंकण्याचा पराक्रम करण्याची संधी विराटसेनेला आहे.
चौथा सामना साउथॅंप्टनला तर शेवटचा सामना किंगस्टन ओव्हलला आहे. हे दोन्ही सामने जर भारताने जिंकले तर एक मोठा इतिहास होणार आहे.
तब्बल ८२वर्षांपुर्वी सर डाॅन ब्रॅडमन यांच्या संघाने ०-२ असे पिछाडीवर असताना मालिकेत ३-२ असा विजय मिळवला होता.
१९३६-३७मध्ये आॅस्ट्रेलिया संघाने हा पराक्रम केला होता. त्यावेळी सर गबी अॅलन यांचा संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी आॅस्ट्रेलियात आला होता. ब्रिसबेन आणि सिडनी कसोटीत आॅस्ट्रेलिया संघाने सपाटून मार खाल्ला होता.
जेव्हा संघ पहिले दोन सामने पराभूत झाला होता तेव्हा तिसऱ्या सामन्यात ब्रॅडमन यांनी २७० धावांची खेळी केली होती. हा सामना मेलबर्नला झाला होता आणि त्यात आॅस्ट्रेलियाने ३६५ धावांनी विजय मिळवला होता.
अॅडलेड कसोटीत १४८ धावांनी आॅस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करत मालिका २-२ अशी बरोबरीत आणली होती. या सामन्यात ब्रॅडमन यांनी २१२ धावांची खेळी केली होती.
तर शेवटचा सामना पुन्हा मेलबर्नलाच झाला. यात पहिल्या डावात ब्रॅडमन यांनी १६७ धावांची खेळी केली. हा सामना आॅस्ट्रेलिया संघाने १ डाव आणि २०० धावांनी जिंकला. यामुळे आॅस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ ने इंग्लंडविरुद्ध जिंकली.
सध्या विराटलाही अशीच काहिशी संधी आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–केदार जाधव आणि आंबाती रायडूचा भारताच्या संघात समावेश
–एशियन गेम्स: 28 वर्षांनंतर इराण कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक
–एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक