---Advertisement---

…तर येत्या ३ वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणार कोहली? टीम इंडियाचा ट्रेंड ठेवणार सुरू

On: सोमवार, जानेवारी 17, 2022 2:21 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. सात वर्ष कसोटी संघाचे नेतृत्व केल्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या (South Africa vs India) मालिकेत पराभूत झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्वतःहून टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तर त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. आता तिन्ही स्वरूपात संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर तो पुढे काय करेल? या चर्चांना उधाण येऊ लागले आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा ट्रेंड पहिला तर, विराट कोहली येत्या २ ते ३ वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करू शकतो. हे आम्ही नाही तर गेल्या काही वर्षांपासूनचा इतिहास सांगतोय. गेल्या काही वर्षांपासून कर्णधारपद सोडल्यानंतर २ ते ३ वर्षात निवृत्त होण्याचा ट्रेंड सुरू आहे. एमएस धोनी आणि सौरव गांगुली यांनी देखील असेच काही केले आहे.

व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव

धोनी आणि गांगुलीने सुरू केला होता ट्रेंड 
भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनीने (Ms dhoni) २०१४ मध्ये कसोटी आणि २०१७ मध्ये वनडे संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्याने शेवटचा कसोटी सामना २०१४ मध्ये तर शेवटचा वनडे सामना २०१९ मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याने ३ वर्षांच्या आत म्हणजेच १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी २००५ मध्ये वनडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ३ वर्षानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. सौरव गांगुली आणि एमएस धोनी नंतर आता या यादीत विराट कोहलीचे नाव देखील जोडले जाऊ शकते. विराट कोहली हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने खेळलेल्या ६८ कसोटी सामन्यांपैकी ४० कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे .

महत्वाच्या बातम्या :

गावसकरांना रोहित नव्हे तर ‘या’ शिलेदारात दिसतोय भावी कसोटी कर्णधार, कारणासहित सांगितले नाव

कोहलीच्या निर्णयावर कुटुंबातून आली प्रतिक्रिया; भाऊ, बहिण म्हणाले, ‘आम्ही सदैव तुझ्या पाठिशी’

हे नक्की पाहा :

विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव। Kohli thanks Dhoni-Shastri

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---