इंग्लंड आणि भारत यांत्यील पाचवा आणि मालिकेतील शेवटचा सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या डावात भारताने ४०० पेक्षा मोठी धावसंख्या उभी केली असून इंग्लंडला मात्र ३०० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोने पहिल्या डावात शतक केले आणि विराट कोहलीच्या हातात झेलबाद झाला. बेयरस्टोचा झेल पकडल्यानंतर विराटच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.
विराट कोहली (Virat Kohli) भारताचा पहिला असा खेळाडू बनला आहे, ज्याने दोन वेगवेगळ्या राष्ट्रीय संघांसोबत खेळताना भारतासाठी ५०-५० पेक्षा जास्त झेल घेतले आहेत. विराटने इंग्लंडच्या पहिल्या डावात यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) याचा उत्कृष्ठ झेल पकडला आणि त्याला तंबूत पाठवले. हा झेल पकडताच त्याने इंग्लंडविरुद्ध त्याचे ५० झेल पूर्ण केले. विराटने आधीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे ५५ झेल पूर्ण केले होते. आता तो दोन वेगवेगळ्या राष्ट्रीय संघांविरुद्ध वैयक्तिक ५० झेल पूर्ण करणारा भारताचा पहिला खेळाडू नबला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीयाचा विचार केला, तर पहिल्या क्रमांकावर राहुल द्रविडचे नाव येते. द्रविडने एकूण २१० कसोटी झेल घेतले आहेत.
पहिल्या डावात भारताची सुरुवात चांगली झाली नसली, तरी संघाने मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात देखील संघाला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. सलामीवीर शुबमन गील अवघ्या ४ धावा करून बाद झाला. गीने पहिल्या डावात देखील १७ धावांवर विकेट गमावली होती. तसेच वरच्या फळीतील हनुमा विहारी पहिल्या डावात २०, तर दुसऱ्या डावात अवघ्या ११ धावा करून बाद झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने २ विकेट्सच्या नुकसानावर १२५ धावा केल्या आहेत. यामध्ये विराट अवघ्या २० धावांचे योगदान देऊ शकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
यंदाच्या वर्षी बेयरस्टो ठरलाय शतकांचा सम्राट, वाचा भारताविरुद्ध खेळताना रचलाय कोणता नवा विक्रम?