इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटी खेळण्यासाठी भारतीय संघ दाखल झाला आहे. हा कसोटी सामना १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीला यावेळी चांगली फलंदाजी करून मालिका काबीज करण्यात मदत करायची आहे. याच दरम्यान भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्या प्रशिक्षकांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना वाटते की त्यांच्या शिष्याने राहुल द्रविडसोबत वेळ घालवणे खूप चांगले आहे. द्रविडसोबत नेटमध्ये वेळ घालवल्याने कोहलीला फायदा होईल, असे शर्माचे मत आहे.
जेव्हा राजकुमार शर्माला विचारण्यात आले की विराट कोहली राहुल द्रविडसोबत नेटमध्ये इतका वेळ घालवत आहे. त्यांना काय फायदा होईल? तर शर्मा म्हणाले की, “विराट बेसिक खेळावर जास्त लक्ष देत आहे. विराट कोहलीच्या खेळात छोटीशी अडचण आली तरी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ते दुरुस्त करू शकतात.”
इंडिया न्यूजशी संवाद साधताना राजकुमार शर्मा म्हणाले की, “विराट त्याच्या मूलभूत गोष्टींवर खूप काम करत आहे. तो बऱ्याच दिवसांपासून फलंदाजीत कठीण प्रसंगातून जात आहे. तो राहुल द्रविडसोबत नेटमध्ये वेळ घालवत आहे ही चांगली गोष्ट आहे. द्रविड हा त्याच्या काळातील महान फलंदाजांपैकी एक आहे.”
शर्मा म्हणाले की, “द्रविडकडे ज्या प्रकारचे तंत्र होते ते आश्चर्यकारक होते आणि त्याचा स्वभावही अप्रतिम होता. असे नाही की विराट कोहली त्याच्या मूळ खेळात अनेक चुका करतोय पण कधी कधी तुमच्याकडून छोट्या-छोट्या चुका होत असतील तर तुमच्याकडे राहुल द्रविडसारखा प्रशिक्षक आहे, तो तुम्हाला कसा सुधारायचा हे सांगू शकतो.”
दरम्यान, भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात १ जुलैपासून मालिकेतील पूर्वनियोजित पाचवा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. याशिवाय मालिकेत ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामन्यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO। बटलरचा ‘हा’ सिक्स पाहून तुम्हीपण म्हणाल ‘नादच खुळा!’
टी२० विश्वचषकासाठी महान कर्णधाराने निवडली भारताची सलामी जोडी, रोहितसह ‘या’ फलंदाजाचं घेतलं नाव