---Advertisement---

कोहलीने प्रथम श्रेणीत १०,००० धावांचा टप्पा तर पार केला, मात्र ‘या’ दिग्गजांना पछाडण्यात अपयशी ठरला

On: सोमवार, सप्टेंबर 6, 2021 2:29 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील ३ कसोटी सामने झाले असून चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरू झाला आहे. यादरम्यान अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या कोहलीला चौथ्या कसोटी सामन्यात थोडा का होईना पण सूर गवसलेला दिसून येत आहे. पहिल्या डावात कोहलीने अर्धशतकी खेळी करत ५० धावा केल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावात त्याने ४४ धावांची खेळी केली.

दुसऱ्या डावात विराटने ३० धावांचा टप्पा पार करताच एका विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा पार केला आहे. त्याला हा करनामा करण्यासाठी २१० डाव खेळावे लागले. मात्र, तरीही तो सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा विक्रम मोडण्यात मागेच राहिला.

विराटचा हा प्रथम श्रेणी क्रिकेटचा १२८ वा सामना आहे. त्याने ५२ च्या सरासरीने १०,००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये ३४ शतक आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. भारताकडून प्रथम श्रेणी सर्वात जलद १०,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम अजय शर्मा यांच्या नावे आहे. त्यांनी केवळ १६० डावांमध्ये हा कारनामा केला होता. म्हणजेच कोहली त्यांच्यापेक्षा ५० डावांनी मागे राहिला.

भारतीय संघाचे सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी देखील २१० डावांमध्ये १०,००० धावांचा टप्पा पार केला होता. इतर भारतीय खेळाडू बाबतीत बोलायचे झाल्यास १०,००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी विजय मर्चंट यांना १७१ डाव खेळावे लागले. व्हीव्हीएस लक्ष्मणने १९४ डाव, सचिन तेंडुलकरने १९५ डाव आणि राहुल द्रविडने २०८ डावांमध्ये हा कारनामा केला होता.

कोहलीने २०१९ पासून क्रिकेटच्या तीनही स्वरूपात अजून पर्यंत शतक केले नाही. मात्र, अनेक दिग्गजांनी या मालिकेत कोहलीकडून शतक येण्याची आशा व्यक्त केली आहे. पण पहिल्या चार सामन्यात तरी तो तीन आकडी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरला आहे. कोहलीने चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ५० धावा केल्या, तर दुसऱ्या डावात कोहलीने ४४ धावा केल्या.

तसेच दुसऱ्या डावात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत यांनी ७ व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यामध्ये शार्दुलने ६० धावा केल्या, तर रिषभ पंतने ५० धावा केल्या. त्यामुळे भारताने ४६६ धावा करत ३६७ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान ठेवले आहे.

महत्वाच्या बातम्या –
पालघर एक्स्प्रेस नॉनस्टॉप!! इंग्लंडला चोप देत दोन्ही डावात झळकावले अर्धशतक, ‘मोठा’ विक्रम केला नावावर
कर्णधाराचे खेळाडूंवरील प्रेम! रोहितच्या शतकानंतर विराटचा उत्साह होता पाहाण्यासारखा, व्हिडिओ व्हायरल
“शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!”, रोहितने विदेशात पहिले कसोटी शतक झळकावल्यानंतर दिग्गजांकडून होतंय कौतुक

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---