---Advertisement---

केवळ ८ धावा करूनही कोहली बनला आणखी एका विक्रमाचा ‘किंग’

On: रविवार, फेब्रुवारी 6, 2022 8:08 PM
kohli 5000
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारपासून (६ फेब्रुवारी) ३ सामन्यांची वनडे मालिका (INDvWI ODI Series) सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय ठरवत वेस्ट इंडीजला अवघ्या १७६ धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यात विशेष योगदान देऊ शकला नाही. परंतु, तरीही त्याने एका खास यादीत आपले नाव सामील केले.

केवळ ८ धावा काढून विराट बाद
पाहुण्या संघाने दिलेले १७७ धावांचे आव्हान पार करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन यांनी पहिल्या गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी केली. अल्झारी जोसेफने रोहित शर्माला बाद करत ही जोडी फोडली. रोहितने ६० धावा बनविल्या.
त्यानंतर आलेला विराट कोहली फार काळ टिकू शकला नाही. पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार वसूल करत त्याने चांगली सुरुवात केली. मात्र, चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात तो झेलबाद झाला.

विराटच्या नावे आणखी एक विक्रम जमा
विराटने केवळ आठ धावा केल्या असल्या तरी यासह त्याने एक मैलाचा टप्पा पार केला. वनडे क्रिकेटमध्ये मायदेशात ५००० धावा करणारा तो चौथा फलंदाज बनला. त्याने ६०.२५ च्या सरासरीने ५००६ भावा भारतीय भूमीवर काढल्या आहेत. त्याने ही कामगिरी केवळ ९६ डावांमध्ये केली. जी या यादीतील इतर खेळाडूंपेक्षा सर्वात जलद आहे.

या यादीमध्ये पहिल्या स्थानी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर आहे. सचिनने त्याच्या वनडे कारकीर्दीत भारतामध्ये खेळताना ४८.२१ च्या सरासरीने ६९७६ धावा काढल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्या आणि तिसर्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंग व दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिस यांनी अनुक्रमे ५५२१ व ५१८६ धावा काढल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

रोहितच्या नेतृत्वात २०२२ मध्ये फुटला टीम इंडियाच्या विजयाचा नारळ; वेस्ट इंडीजवर केली ६ गड्यांनी मात 

कोरोनासारख्या संकटांवर मात करत यश धूलच्या भारतीय संघाने जिंकला विश्वचषक, वाचा संघाचा संपूर्ण प्रवास 

U19 WC: दक्षिण आफ्रिकेचा ‘बेबी एबी’ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी, पाहा आजपर्यंतच्या विजेत्यांची संपूर्ण यादी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---