विराट कोहली याने सोमवारी (11 सप्टेंबर) आपल्या कारकिर्दीतील मोठा पट्टा पार केला. वनडे क्रिकेटमध्ये या भारतीय दिग्गजाने आपल्या 13000 वनडे धावा पूर्ण केल्या. भारत आणि पाकिस्तान संघातील ही लढत फारच रोमांचक ठरत आहे. विराटने या सामन्यात आपले 47 वे शतक देखील पूर्ण केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना रविवारी (10 सप्टेंबर) निकाली लागणे अपेक्षित होते. मात्र पावसामुळे सामना रविवारी पूर्ण होऊ शकला नाही. सोमवारी भारताने 24.1 षटकात 2 बाद 147 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. विराट कोहली 8* आणि केएल राहुल 17* धावांपासून पुढे खेळताना सोमवारी अप्रतिम लयीत दिसले. दोघांमध्ये मोठी भागीदारी झालीच. पण विराट कोहलीने वनडे कारकिर्दीत 13000 धावांचा टप्पा पूर्ण केला.
13000 ODI runs and counting for 👑 Kohli
He also brings up his 47th ODI CENTURY 👏👏#TeamIndia pic.twitter.com/ePKxTWUTzn
— BCCI (@BCCI) September 11, 2023
(Virat Kohli completed 13000 ODI runs in his career)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
धमाकेदार कमबॅक! दुखापतीनंतर परतणाऱ्या राहुलने पाकिस्तानसमोर ठोकलं अर्धशतक
IND vs PAK । राहुलपाठोपाठ विराटनेही दाखवला क्लास! अवघ्या ‘इतक्या’ चेंडूत पूर्ण केलं अर्धशतक