जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शनिवार (१८ जून) पासून सुरुवात झाली. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी आमनेसामने आहेत. इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर हा सामना खेळवला जातो आहे.
हा सामना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी महत्वाचा आहे. कर्णधार म्हणून आपली पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची त्याला या सामन्यात संधी आहे. ही संधी तो साधणार की नाही, हे सामन्याच्या निकालानंतरच कळेल. मात्र तत्पूर्वी पहिल्या डावात फलंदाजी करतांना त्याने खास विक्रम केला आहे.
जॅक कॅलिसला टाकले मागे
या डावात फलंदाजी करतांना विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतांना कसोटी कारकिर्दीतील ६००० धावांचा टप्पा गाठला. हा कारनामा करणारा तो भारताचा दुसरा तर जगातील नववा फलंदाज ठरला. या यादीत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे.
चौथ्या क्रमांकावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा –
१) सचिन तेंडुलकर – १३४९२
२) महेला जयवर्धने – ९५०९
३) जॅक कॅलिस – ९०३३
४) ब्रायन लारा – ७५३५
५) जावेद मियांदाद – ६९२५
६) रॉस टेलर – ६९१२
७) मार्क वॉ – ६६६२
८) केव्हिन पीटरसन – ६४९०
९) विराट कोहली – ६०००*
कोहलीने केवळ ६००० धावांचा टप्पाच पार केला नाही, तर हा टप्पा सगळ्यात कमी डावात गाठणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने १११ डावात हा टप्पा गाठला. यात त्याने जॅक कॅलिसला मागे टाकले. कॅलिसने हा कारनामा ११३ डावात केला आहे. या यादीत देखील सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी असून त्याने १०९ डावात ही कामगिरी केली आहे.
सर्वात कमी डावात चौथ्या क्रमांकावर ६००० धावा पूर्ण करणारे फलंदाज-
१) सचिन तेंडुलकर – १०९
२) विराट कोहली – १११*
३) जॅक कॅलिस – ११३
४) जावेद मियांदाद – ११३
५) महेला जयवर्धने – ११५
६) ब्रायन लारा – ११७
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय प्रशिक्षकाने केली रोनाल्डोची नक्कल; व्हिडिओ भन्नाट व्हायरल
कोरोना नियमांमध्ये शिथिलता मिळताच, कुटुंबासोबत एमएस धोनी पोहोचला ‘शिमला’
शेफालीचे ‘अविस्मरणीय’ पदार्पण! दोन अर्धशतकांसह केले अनेक विक्रम नावे