---Advertisement---

टीम इंडियाने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अशी वाहिली श्रद्धांजली

On: रविवार, फेब्रुवारी 24, 2019 9:29 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(24 फेब्रुवारी) पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे. ही काळी पट्टी भारतीय संघाने 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ बांधली आहे.

तसेच भारतीय संघातील आणि ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी, सपोर्ट स्टाफने सामना सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत झाल्यानंतर दोन मिनीटे शांतता राखत या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर हा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले तर अनेक जवान जखमी झाले आहेत.

आज या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताचा डाव 20 षटकात 7 बाद 126 धावांवर रोखला.

 

भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तसेच एमएस धोनीने नाबाद 29 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून नॅथम कुल्टर नाईलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment