Loading...

भारताकडून आज पदार्पण करणारा कोण आहे मयंक मार्कंडे…

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यातून भारताकडून मयंक मार्कंडे या 21 वर्षीय युवा गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तो भारता़कडून टी20मध्ये पदार्पण करणारा 79 वा खेळाडू ठरला आहे.

मार्कंडे आयपीएलच्या 11 व्या मोसमात प्रकाश झोतात आला आहे. त्याचा गेल्या एक वर्षातील प्रवास स्वप्नवत झाला आहे. त्याने नुकतेच भारत अ संघाकडून खेळताना इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या.

मुंबई इंडियन्सने 2018 च्या आयपीएलसाठी 20 लाख रुपयांना संघात घेतलेल्या मार्कंडेने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सर्वांना प्रभावित केले. त्याने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला गुगली चेंडू टाकत पायचीत बाद केले. तर अंबाती रायडू आणि दिपक चहर या खेळाडूंचीही पहिल्याच सामन्यात विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधले होते.

आयपीएल 2018 मध्ये एका वेळी तर तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही होता. त्याने आयपीएल 2018 मध्ये 14 सामन्यात 24.53 च्या सरासरीने 15 विकेट्स घेतल्या. यात त्याने एका सामन्यात 4 विकेट्स घेण्याचीही कामगिरी केली होती.

त्यानंतर त्याने पंजाबकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना आंध्रप्रदेश विरुद्ध पहिल्याच सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. त्याआधी सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी 2018 मध्ये त्याने पंजाबकडून टी20 मध्ये पदार्पण केले होते.

Loading...

मयंकने भारत अ संघाकडून खेळताना इंग्लंड लायन्स विरुद्ध वनडे मालिकेतही चांगली कामगिरी केली होती. तसेच त्याआधी एमर्जिंग एशिया कप स्पर्धेतही मयंकने भारत अ कडून चांगली कामगिरी केली होती.

मयंक मुळचा महाराष्ट्रीयन…

11 नोव्हेंबर 1997 ला पंजाबच्या पटियाला शहरात जन्मलेल्या मार्कंडेचे कुटुंब मुळचे महाराष्ट्रीयन आहे. त्याचे आई-वडिल अनेक वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात पंजाबमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यामुळे मयंकचे संपूर्ण बालपणही पंजाबमध्येच गेले आहे.

मयंकला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्याने 16 व्या वर्षी पंजाबच्या 19 वर्षांखालील संघात स्थान मिळवले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्याला भारताच्या 19 वर्षांखालील संघात जागा मिळाली. तसेच त्यानंतर त्याने फेब्रुवारी 2018 ला पंजाबकडून विजय हजारे ट्रॉफीतून अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

मार्कंडेने त्याची कारकिर्द वेगवान गोलंदाज म्हणून सुरु केली होती. पण नंतर त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला फिरकी गोलंदाजी करायला सांगितली. त्याने टाकलेला गुगली चेंडू अनेक फलंदाजांनी चकवतो.

मार्कंडेने आत्तापर्यंत 7 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळताना 34 विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने तीनवेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे. तसेच 22 अ दर्जाचे सामने खेळताना मार्कंडेने 19.97 च्या सरासरीने 45 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धवनला विश्रांती, पहिल्या टी२० साठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

Loading...

विराट कोहलीच्या मते हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे सर्वात धोकादायक

 विश्वचषकाआधी कर्णधार कोहलीचा टीम इंडियाच्या खेळाडूंना खास सल्ला…

You might also like
Loading...