टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली 13 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार आहे. यासाठी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) सोमवारी संघाची घोषणा केली. ज्यामध्ये विराट कोहलीचे नाव देखील समाविष्ट होते. सरावसाठी विराट आज ( जानेवारी) सकाळी संघात सामील झाला. ज्यात त्याने जंगी सराव केला आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये विराट कोहलीने त्याच्या राज्य संघाच्या खेळाडूंसोबत सरावात भाग घेतला. दिल्लीला 30 जानेवारीपासून या मैदानावर रेल्वेविरुद्ध सामना खेळायचा आहे. याच दरम्यान अहवालात मोठा खुलासा झाला आहे. विराट कोहलीने दिल्लीचे कर्णधारपद नाकारले आहे. वास्तविक, दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) कडून कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली असूनही, कोहलीने संघाचे नेतृत्व न करण्याचा निर्णय घेतला.
विराटने कर्णधारपद नाकारल्याने संघाचा युवा खेळाडू आयुष बदोनी कर्णधारपदाची भुमिका बजावणार आहे. भारताकडून त्याने अद्याप डेब्यू केले नाही. आयुष बदोनी लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) साठी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये एक महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएल 2025 च्या आधी फ्रँचायझीने त्याला 4 कोटी रुपयांना कायम ठेवले होते.
विराट कोहलीने नोव्हेंबर 2012 मध्ये शेवटचा रणजी ट्रॉफी सामना खेळला होता. कोहलीने हा सामना दिल्लीकडून उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला. मात्र, कोहलीला सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीने पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 43 धावा केल्या. दोन्ही डावात कोहलीला भुवनेश्वर कुमारने बाद केले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की किंग कोहलीने नोव्हेंबर 2006 मध्ये तामिळनाडूविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीत 23 रणजी ट्रॉफी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 50.77 च्या सरासरीने 1574 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 5 शतके देखील ठोकल्या आहेत.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी एबी डिव्हिलियर्सचे पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना दिसणार?
रणजी सामन्यासाठी विराट दिल्ली संघात सामील, घरच्या मैदानावर कोहली अनोख्या अंदाजात, पाहा VIDEO
राजकोटमध्ये टीम इंडिया विजयाची हॅट्ट्रीक करणार का? सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट