अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना सुरू आहे. गोलंदाजांनी पहिला दिवस गाजवल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या दिवशी काहीसा अडचणीत आला आहे. भारताने १६७ धावांमध्ये आपले ६ प्रमुख गडी गमावले आहेत. ज्यामध्ये कर्णधार विराट कोहली खातेही खोलू शकला नाही. शून्यावर बाद होताच चाहत्यांनी विराटला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
विराट झाला शून्यावर बाद
अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार विराट कोहली खातेही खोलू शकला नाही. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने त्याला यष्टीरक्षक बेन फोक्सच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. विराट या मालिकेत दुसऱ्या चेन्नई कसोटीत देखील शून्यावर बाद झाला होता. विराटने या मालिकेत आत्तापर्यंत ११, ७२, ०, ६२, २७ व ० अशा धावा बनविल्या आहेत. मागील सात सामन्यांत तो कसोटीत शतक देखील झळकावू शकला नाही.
चाहत्यांनी केले ट्रोल
अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर विराटला चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने एका हे प्रसिद्ध हिंदी सिनेमातील संवाद वापरून मीम बनविले आहे.
Can't deny but Kohli innings these days &
Everytime people expecting his ???? – pic.twitter.com/3W5zW1UkeO— Aash Mehta (@iamaashmehta) March 5, 2021
एका ट्विटर वापरकर्त्याने त्याचे पुढील शतक कधी येणार, हे विचारताना लिहिले की,
‘तू ७१ वी सेंच्युरी कब मारेगा रे चिकू’
Kab mere bhai ? pic.twitter.com/F299zujKyr
— clumsy guy (@Mohit33394010) March 5, 2021
अन्य एका ट्विटर खात्यावरून ‘किंग कोहली’ असे लिहून हसण्याच्या बऱ्याच इमोजी पोस्ट केली आहेत. तसेच त्या खाली, बदकाच्या पिल्लाचा एक छोटा व्हिडिओ टाकला आहे.
https://twitter.com/lukebodily27/status/1367704681397559299?s=20
I'm not going to say anything now, becs people will start to say Kohli haters.. but I can't defend his 0 as a Indian cricket fan..
Rohit/Kohli haters-supporters let's start ur job ! ????Meanwhile we Indian cricket fans – pic.twitter.com/RfVgQybIXy
— Aash Mehta (@iamaashmehta) March 5, 2021
— Priyanshu (@cricketwalaldka) March 5, 2021
सध्या खेळत असणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसर्या स्थानी आला आहे. तो आतापर्यंत १२ डावात खाते खोलू शकला. तसेच, सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये त्याने एमएस धोनीची बरोबरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
स्टोक्सचा जोरदार बाउन्सर धडकला रोहितच्या हेल्मेटला अन् घडलं असं काही, पाहा फोटो
विराट आणि शून्य! कसोटीत ‘इतक्यांदा’ कोहली भोपळाही न फोडता झालाय बाद
विराटचा जुळा भाऊ आला अहमदाबाद कसोटी पाहायला? फोटो पाहून तुम्हीही गोंधळात पडालं






