---Advertisement---

चप्पल, चार्जर, शेकर; ईशांतची सामानाने खचाखच भरलेली बॅग पाहून विराट म्हणे, ‘जो कोणी हिला घेऊन पळून…’

On: शुक्रवार, डिसेंबर 17, 2021 10:27 PM
Virat-And-Ishant-Doing-Prank-In-Flight
---Advertisement---

येत्या काही दिवसात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. लवकरच तिथे भारतीय संघ सरावाला सुरुवात करणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली ईशांत शर्माची खिल्ली उडवताना दिसून येत आहे.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी भारतीय संघाचा मुंबई पासून ते जोहान्सबर्ग पर्यंतचा प्रवास दाखवला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली ईशांत शर्माची खिल्ली उडवत त्याच्या बॅगमध्ये डोकावताना दिसून येत आहे.

विराट कोहली जेव्हा त्याच्या बॅगमध्ये डोकावू लागला, त्यावेळी त्याने ईशांत शर्माच्या बॅगमधील सामानावरून त्याची मजा घ्यायला सुरुवात केली. विराट म्हणाला की, ‘या व्यक्तीच्या बॅगेत सर्वकाही आहे. चप्पल, चार्जर, शेकर सर्वकाही आहे. अशी बॅग मी पहिल्यांदाच पाहिली आहे. जो कोणी ही बॅग घेऊन जाईल तो जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकतो.’

https://twitter.com/BCCI/status/1471692298756911107?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1471692298756911107%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-36557969021391056553.ampproject.net%2F2112032204000%2Fframe.html

दक्षिण आफ्रिका दौरा हा कर्णधार विराट कोहलीसाठी अतिशय खास असणार आहे. कारण याच दौऱ्यावर विराट कोहली आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणार आहे. परंतु या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. तसेच हा दौरा ईशांत शर्मासाठी देखील महत्वाचा ठरणार आहे. कारण गेल्या काही महिन्यात तो साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. जर त्याला प्लेइंग इलेव्हेनमध्ये स्थान मिळाले तर त्याला स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. कारण न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरलं होता.

महत्वाच्या बातम्या :

बेंगलोरची पराभवाची मालिका खंडित; एटीकेविरूद्ध मानावी लागली ३-३ अशी बरोबरी

Video: ‘टीम इंडिया’ पोहोचली दक्षिण आफ्रिकेत; श्रेयसने धरला ताल तर विराट…

डी कॉक होणार बाबा! कसोटी मालिकेपूर्वी पत्नीसह घेतोय सुट्ट्यांचा आनंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---