---Advertisement---

बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी विराटची छेड काढली, संतापलेल्या कोहलीचा व्हिडिओ व्हायरल

On: शुक्रवार, डिसेंबर 27, 2024 3:25 PM
---Advertisement---

सध्या जारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीचा फॉर्म फारसा चांगला राहिलेला नाही. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत त्यानं शतक झळकावलं होतं. मात्र तेव्हापासून त्याची बॅट शांत झाली आहे. एकीकडे कोहली बॅटनं फ्लॉप होत असताना तो मैदानावर ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कोन्स्टासला भिडला. या घटनेनंतर कोहली ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन चाहते कोहलीला बाद झाल्यानंतर चिडवत आहेत आणि नंतर कोहली संतापलेला दिसतोय.

मेलबर्न कसोटीत भारताच्या पहिल्या डावात विराट कोहली बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना ही घटना घडली. कोहली परतत असताना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी त्याची छेड काढली, त्यानंतर तो चागलाच संतापला. कोहलीचा राग एवढा होता की तो थेट प्रेक्षकांचा सामना करण्यासाठी सज्ज झाला.

व्हिडीओमध्ये दिसतंय की, ऑस्ट्रेलियन चाहते कोहलीला ‘बू’ करत होते. दरम्यान, गर्दीत उपस्थित काहींनी कोहलीला असं काही तरी म्हटलं, जे त्याला आवडलं नाही. ते ऐकून कोहली पॅव्हेलियनच्या अर्ध्या वाटेवरून परत येतो आणि गर्दीत कोण काय बोलतोय ते पाहू लागतो. कोहली बाहेर येताना पाहून एक व्यक्ती त्याला परत आत घेऊन जाते.

 

मेलबर्न कसोटीचे दोन दिवस पूर्ण झाले आहेत. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियानं पहिल्या डावात फलंदाजी करताना 164/5 धावा केल्या आहेत. सध्या भारतीय संघ 310 धावांनी पिछाडीवर आहे. दिवसअखेर रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा संघासाठी नाबाद परतले. पंतनं 6 तर जडेजानं 4 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात एकूण 474 धावा केल्या होत्या. संघासाठी स्टीव्ह स्मिथनं सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानं 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 140 धावा केल्या.

हेही वाचा – 

यशस्वीचे शतक हुकले, तरीही केला खास विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकले मागे
यशस्वी जयस्वालच्या रनआऊटमध्ये चुकी कोणाची होती? माजी क्रिकेटपटूंच्या जोरदार वादाचा व्हिडिओ समोर
IND vs AUS; रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप होण्याची 3 मोठी कारणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---