भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली जवळपास 3 वर्षे खराब फॉर्मचा सामना करत होता. त्याला आंतरराष्ट्रीय शतक करण्यासाठीही तब्बल 1000हून अधिक दिवसांचा कालावधी लागला. मात्र, तो मागील वर्षी आशिया चषकात चमकला. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावत फॉर्ममध्ये परतल्याचे दाखवून दिले. आता त्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीतील दुसऱ्या सामन्यात दिल्ली येथे ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चला तर त्याने काय कामगिरी केली आहे, ते जाणून घेऊयात…
विराट कोहली (Virat Kohlii) याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील दुसऱ्या कसोटीत शानदार कामगिरी केली. भारताच्या दुसऱ्या डावात खेळताना विराटने 12वे षटक टाकत असलेल्या नेथन लायन याच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारत 10 धावा पूर्ण केल्या. या धावा करताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली 25000 धावांचा (Virat Kohli 25000 Runs) टप्पा पार करणारा दुसरा भारतीय खेळाडू बनला. खरं तर, विराटने या सामन्याच्या पहिल्या डावात 44 धावा केल्या होत्या. तसेच, त्याला 25000 हजार धावांचा आकडा गाठण्यासाठी 8 धावांची गरज होती. त्याने भारताच्या दुसऱ्या डावात विराटने 31 चेंडूंचा सामना करत 3 चौकारांच्या मदतीने 20 धावांचे योगदान दिले. या धावा करताच विराटने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
𝐌𝐢𝐥𝐞𝐬𝐭𝐨𝐧𝐞 𝐔𝐧𝐥𝐨𝐜𝐤𝐞𝐝! 🔓
Congratulations @imVkohli on reaching 2️⃣5️⃣0️⃣0️⃣0️⃣ international runs in international cricket! 🫡
Simply sensational 👏🏻👏🏻#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/Ka4XklrKNA
— BCCI (@BCCI) February 19, 2023
विशेष म्हणजे, विराट कोहली हा आता सचिन तेंडुलकर याच्यानंतर 25000 धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू आणि जगातील पाचवा खेळाडू बनला आहे. खास बाब अशी की, विराटने ही कामगिरी करताच सचिनचाही एक विक्रम मोडला आहे. विराट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 25000 धावा करणारा अव्वल क्रमांकाचा खेळाडू ठरला. त्याने 25000 धावा करण्यासाठी एकूण 549 डावांचा सामना केला.
Yet another milestone to Virat Kohli's name ⭐#WTC23 | #INDvAUS pic.twitter.com/XnnNZneik3
— ICC (@ICC) February 19, 2023
वेगवान 25000 धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 577 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर यादीत तिसऱ्या स्थानी रिकी पाँटिंग असून त्याने 588 डावांमध्ये 25000 धावा केल्या होत्या. तसेच, यादीत चौथ्या स्थानी जॅक कॅलिस असून त्याने 594 डावांमध्ये आणि पाचव्या स्थानी असलेल्या कुमार संगकारा याने 608 डावांमध्ये वेगवान 25000 धावा केल्या होत्या. (Virat Kohli Fastest to 25000 international runs)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 25000 धावा करणारे दिग्गज (डावानुसार)
549- विराट कोहली*
577- सचिन तेंडुलकर
588- रिकी पाँटिंग
594- जॅक कॅलिस
608- कुमार संगकारा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! सौराष्ट्र संघ बनला रणजी ट्रॉफी 2023चा चॅम्पियन, 3 वर्षात दुसऱ्यांदा पटकावला किताब
कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘बाप’ कामगिरी करणारे 3 आशियाई स्पिनर्स, यादीत जडेजा एकमेव भारतीय