भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही दिवसांपूर्वी टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यामागे त्यानी वर्कलोड मॅनेजमेंटचे कारण दिले होते. त्यानंतर त्याने आयपीएल स्पर्धेत देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता विराट कोहलीने भारतीय वनडे संघाचे देखील कर्णधारपद सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय संघाला येत्या २०२२ टी२० विश्वचषक स्पर्धेमुळे अधिक टी२० सामने खेळण्याची संधी मिळणार आहे, तर येणाऱ्या वर्षात खूप कमी वनडे सामने खेळले जाणार आहेत. भारतीय संघ येणाऱ्या वर्षात ९ वनडे सामने खेळणार आहे. ज्यापैकी ३ दक्षिण आफ्रिकेत, ३ इंग्लंडमध्ये आणि ३ भारतात होणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर देखील कडक बायो बबलचे पालन केले जाणार आहे.त्यामुळे पुन्हा एकदा बीसीसीआय प्रत्येक स्वरूपासाठी २० ते २३ खेळाडूंचा संघ निवड करू शकते.
कोहलीच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआयचे अधिकारी दोन भागात विभागले गेले आहेत. या वर्षी फारसे वनडे सामने खेळले जाणार नाहीये, त्यामुळे विराटला भारताचा कर्णधार राहण्याची परवानगी द्यावी, असे एका वर्गाचे मत आहे. तर दुसऱ्या वर्गाचे मस्त आहे की, टी२० आणि वनडे संघाचा कर्णधार वेगळा नसावा आणि रोहितकडे वनडे संघाची कमान सोपवावी.
कोहली वनडे संघाचा कर्णधार राहणार की नाही याबाबत चर्चा होणार, हे निश्चित आहे. याबाबतचा निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह घेणार आहेत. विराटला आतापर्यंत आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आली नाहीये. परंतु, द्विपक्षीय मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “येत्या ५ दिवसात भारतीय संघाची घोषणा होणार आहे. आम्ही सरकारच्या परवानगीची वाट पाहतोय. जर सरकारने आम्हाला हा दौरा रद्द करण्यास सांगितले, तर आम्ही ते ही करू. परंतु, आम्हाला संघाची निवड करावीच लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केवळ २ हॉटेलमध्ये थांबेल भारतीय संघ, दर्शकही असतील मर्यादित; वाचा गाइडलाइन्स
तब्बल ५ वर्षानंतर वानखेडेवर रंगणार कसोटी, असा राहिला आहे भारताचा या मैदानावरील इतिहास