---Advertisement---

VIDEO; कोहलीच्या बॅटने आकाश दीपनं ठोकला षटकार! अन् कोहली, रोहितसह गंभीरचा आनंद गगनात मावेना

---Advertisement---

सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना गाबाच्या मैदानावर खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ‘आकाश दीप’चे (Akash Deep) नाव चमकले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात आकाश चेंडूने फार काही करू शकला नाही, पण भारताच्या पहिल्या डावात त्याने बॅटने ते केले जे रोहित शर्मा (Rohit Sharman), विराट कोहली (Virat Kohli), शुबमन गिल (Shubman Gill), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), रिषभ पंत (Rishabh Pant) सारखे फलंदाजही करू शकले नाहीत.

आकाश दीप (Akash Deep) 11व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. दरम्यान सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या अखेरीस त्याने 31 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 27 धावा केल्या. चौथ्या डावात आकाशने मारलेला षटकार पाहून ‘विराट कोहली’ने (Virat Kohli) उडी घेतली.

‘आकाश दीप’च्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की, आधी आकाशने चौकार मारून भारतीय संघाला फॉलोऑनपासून वाचवले. यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि स्टार फलंदाज ड्रेसिंग रूममध्ये खूप आनंदी दिसत होते.

त्यानंतर पुढे व्हिडिओमध्ये आकाशने ऑस्ट्रेलियन कर्णधार ‘पॅट कमिन्स’च्या (Pat Cummins) चेंडूवर लांब षटकार ठोकला. आकाशचा षटकार पाहून ‘विराट कोहली’ने लगेच उडी घेतली. लांबलचक षटकार पाहून कोहलीला आश्चर्य वाटले. यादरम्यान कोहली आणि गंभीरसोबत कर्णधार ‘रोहित शर्मा’ही ड्रेसिंग रूममध्ये खूप खुश दिसला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर सामन्याच्या चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 252/9 धावा केल्या आहेत. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आकाश दीप चौथ्या दिवशी नाबाद परतले. ‘आकाश दीप’ने 31 चेंडूत 27 धावा केल्या. दरम्यान त्याने 2 चौकारांसह 1 षटकार ठोकला. तर बुमराहने 27 चेंडूत 10 धावा केल्या. दरम्यान त्याने 1 षटकार ठोकला. आता भारतीय संघ 193 धावांनी मागे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“माझे स्वप्न विराट कोहलीला भेटायचे आहे” स्टार खेळाडूने व्यक्त केली इच्छा
सूर्यकांत व्यायाम शाळा, दुर्गामाता स्पोर्टस्, विजय नवनाथ यांची विजयी सलामी
IND vs AUS: गाबा कसोटी दरम्यान संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू मालिकेतून बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---