---Advertisement---

व्हिडिओ: अन् कोहलीने स्टंपवर काढली भडास, इंग्लंडला ‘असा’ झाला फायदा

On: सोमवार, मार्च 15, 2021 1:50 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना अहमदाबादस्थित नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. पाहुण्या इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग भारने १८ षटकांच्या आत केला. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने मोलाचा वाटा उचलला. मात्र, तो फलंदाजीला येण्याआधी मैदानावर घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाला होता.

अशी घडली घटना
भारतीय कर्णधार विराट कोहली इंग्लंडच्या डावा दरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला. त्याचे झाले असे की, हार्दिक पंड्या टाकत असलेल्या दहाव्या षटकातील एक चेंडू इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोने मिड विकेटला मारला. स्वतः पंड्या तो चेंडू घेण्यासाठी धावला. त्याने चेंडू उचलून दुसऱ्या बाजूला आलेल्या विराट कोहलीकडे फेकला. मात्र, कोहली तो चेंडू अडवू शकला नाही आणि ओव्हर-थ्रोची एक धाव अतिरिक्त गेली. त्यानंतर, चाहत्यांनी सोशल मीडियावर कोहलीला चांगलेच ट्रोल केले गेले.

https://twitter.com/Arjun_Virat_/status/1371105832964747266

एका चाहत्याने ट्विट करून लिहिले, ‘कोहलीने आधीच एक धाव बनवली आहे’

एका ट्विटर वापरकर्त्याने लिहीत म्हटले, ‘विराट भारतीय संघावर आता ओझे होऊ लागला आहे. फलंदाजीत शून्य तर, क्षेत्ररक्षणात फुकट धावा तो देत आहे.’

https://twitter.com/cathsbruv/status/1371105018498199553

भारताचे चोख प्रत्युत्तर
इंग्लंडने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने नेटाने फलंदाजी सुरू केली. केएल राहुल खातेही खोलता तंबूत परतल्यानंतर पदार्पण करणारा युवा ईशान किशन व कर्णधार विराट कोहली यांनी ९४ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. ईशान अर्धशतक करून माघारी परतल्यानंतर रिषभ पंतने १३ चेंडूत २६ धावांची आक्रमक खेळी खेळली. अखेर श्रेयस अय्यरसोबत मिळून विराटने भारतीय संघाला विजयी रेषेपार नेले. मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (१६ मार्च) खेळला जाईल. विराटने ७३ धावांची नाबाद खेळी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---