कराची। पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील रोमांचक झालेला दुसरा सामना बुधवारी (१६ मार्च) अनिर्णित राहिला. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने दिलेली झुंज बुधवारी चर्चेचा विषय ठरली. त्याचबरोबर त्याच्यामुळे भारताचा माजी कर्णधार विराट कोहली बराच ट्रोल देखील झाला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला (Pakistan vs Australia) ५०६ धावांचे मोठे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बाबर आझमने (Babar Azam) ४२५ चेंडूत २१ चौकार आणि १ षटकार मारताना १९६ धावा केल्या. त्याचे द्विशतक ४ धावांनी थोडक्यात हुकले. पण, १९६ ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याला नॅथन लायनने मार्नस लॅब्यूशेनच्या हातून झेलबाद केले.
बाबरची प्रतिक्षा संपली, पण विराटची कायम
विशेष म्हणजे बाबर आझम जवळपास २ वर्षांपासून कसोटीत शतकाच्या प्रतिक्षेत होता. पण अखेर त्याने ७६७ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर कसोटीत शतकी खेळी केली आहे. पण, बाबर प्रमाणेच गेल्या २ वर्षांपासून विराट कोहलीही (Virat Kohli) शतकाच्या प्रतिक्षेत आहे. त्याने त्याचे अखेरचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध केले होते. त्यानंतर त्याने अनेकदा अर्धशतके केली, मात्र त्याला तीन आकडी धावसंख्या गाठण्यात अपयश येत आहे. त्यातच अनेक वर्षांनंतर त्याची कसोटी सरासरीने ५० च्या खाली घसरली आहे. याचमुळे चाहत्यांनी बुधवारी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक मीम्सही बुधवारी व्हायरल झाले.
https://twitter.com/black_sudais_56/status/1503753921529061378
Babar Azam is NOT the Virat Kohli of Pakistan.
Tip: Interpret this as per your convenience. 😃#AUSvPAK | #PAKvAUS
— Ravi Bhai 🤷♂️ (@tracer_bullet1) March 16, 2022
#BabarAzam𓃵 scores his first Test Century since Feb, 2020.
Fans to Virat Kohli: #PakVsAustraila #PAKVSAUS pic.twitter.com/igWy6GZdo1
— Usman Saleem Akhter (@UsmaanSaleem) March 15, 2022
https://twitter.com/arsetweets/status/1504155846401482753
Finally a test hundred for Bobby, but what about Virat Kohli?#BabarAzam𓃵 #Babar pic.twitter.com/AFZxVH5Edo
— Cricket Coder (@cricket_coder) March 15, 2022
#BabarAzam to Virat Kohli after today:#PakVsAustraila pic.twitter.com/SAMbX8Y5xk
— Sidhu from 🇵🇰 (@Azsidhu) March 15, 2022
Bobby scored a century 💯 after 2 year ❤️. Excellent knock under pressure ♥️.He and Abdullah shafique will chase this target InshAllah 💯. Now I am just waiting for @imVkohli century 💯#BabarAzam𓃵 pic.twitter.com/XkxMLDID0L
— Ahmad hassan (@Crikut_Espert) March 15, 2022
https://twitter.com/Shreyatiwari98/status/1503717173386448897
https://twitter.com/m_i_abdulhalik/status/1503710285336440832
बाबर आणि विराट यांच्यात होते तुलना
विराट आणि बाबर यांनी आपापल्या संघांसाठी खेळताना अनेकदा शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात अनेकदा बाबरची तुलना विराटबरोबर केली जाते. त्यातच आता बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत विराट फलंदाजांच्या यादीत ९ व्या क्रमांकावर घसरला आहे, तर बाबर ८ व्या क्रमांकावर पोहचला आहे. विराट आणि बाबर यांच्यातील रेटिंग गुणांमध्ये केवळ १ गुणाचा फरक आहे. बाबरचे ७४३ गुण आहेत आणि विराटचे ७४२ गुण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडीज वि इंग्लंड कसोटी पाहण्यासाठी साक्षात ‘युनिव्हर्स बॉस’ची हजेरी; पाहा फोटोज
अश्विनकडून जास्तीत-जास्त शिकण्याचा प्रयत्न करणार ‘हा’ युवा अष्टपैलू; म्हणाला…