भारतीय खेळ जगतातील मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची काल घोषणी झाली. त्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या नावाची घोषणा गुरुवारी क्रिडा मंत्रालयाने केली.
भालाफेकपटू निरज चोप्रा याच्यासहीत 20 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली असून 25 सप्टेंबरला या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोंवींद यांच्या हस्ते होणार आहे.
कोहलीच्या नावावर शून्य गुण आहेत तरीही त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. क्रिकेटचा समावेश या गुणतालिकेत केला जात नाही. पुरस्कार विजेती मीराबाई चानू हिला 44 गुण आहेत. तिच्यापेक्षा 6 खेळाडूंचे गुण जास्त आहेत.
80 गुण मिळवून आघाडीवर असलेल्या कुस्तीपटू बंजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना वगळण्यात आले असून त्यावर ते नाराज झाले आहेत. क्रिडा मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर पुनियाने या पुरस्कारांच्या निवडी विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.
गुणतालिकेत सर्वात जास्त गुण मिळवून देखील आपल्याला वगळण्यात आले तर त्या गुणतालिकेचा उपयोग काय असा प्रश्न पुनियाने उपस्थित केला आहे.
कोहलीचे नाव जेव्हा चर्चेसाठी आले तेव्हा 11 सदस्यांपैकी 8 सदस्यांनी त्याच्या नावाची शिफारस केली तर मीरबाई चानूच्या बाजूने 7 सदस्यांनी आपला कौल दिला.
भारतीय संघासाठी सतत धावांची बरसात करणाऱ्या विराट कोहलीच्या नावाची शिफारस बीसीसीआयने एप्रिल महिन्यातच केली होती. कोहली हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. कोहलीआधी महेंद्रसिंग धोनी (2007) सचिन तेंडुलकर (1997) यांना देखील राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–तब्बल एक वर्षानंतर दिग्गज अष्टपैलू खेळाडूचे टीम इंडियात पुनरागमन
–धोनीसाठी आजचा दिवस खास, बांगलादेशविरुद्ध होऊ शकतो विक्रमांचा विक्रम
–या कारणामुळे सुनील गावस्करांनी फकार जामन आणि दिनेश कार्तिकला सुनावले खडेबोल