भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सध्या सुरू असलेला आशिया चषक सुपर 4 सामना रोमांचक स्थितीत आहे. या सामन्यात भारतीय संघाने आक्रमक खेळ करण्याचा विशेष प्रयत्न केला. या प्रयत्नात अनेक भारतीय फलंदाज आपली विकेट गमावून बसले मात्र, टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली एका बाजूला आक्रमक खेळी करत क्रिजवर टिकून राहिला आणि अखेर लागोपाट 2 सामन्यात अर्ध शतक झळकावले आहे.
FIFTY!
Back to back half-centuries for @imVkohli 👌👌
Live – https://t.co/xhki2AW6ro #INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/K9gLCdqILm
— BCCI (@BCCI) September 4, 2022
आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात नेहमी दबाव कायम असतो. मात्र, या सानमन्यात भारतीय फलंदाजांनी पहिल्या ओव्हरपासून आक्रमक खेळ केला. त्याच स्वरूपात विराटने आपली खेळा चालू ठेवली आणि षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटी आपल्या खेळीत कोहली 44 चेंडूत 60 धावा करत धावबाद झाला. मात्र, त्याच्या या विशेष खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 7 बाद 181 धावा करण्यात यशस्वी झाला. सामन्याच्या शेवटच्या दोन चेंडूवर रवी बिश्नोईनने दोन चौकार लगावत भारताला चांगला शेवट करून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘ही संधी म्हणजे माझ्यासाठी मोठी बाब!’, एनसीएतील युवकांना मिळाले बुमराहचे मार्गदर्शन
INDvsPAK: राहुलचे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! चांगल्या सुरुवातीनंतर धरला पव्हेलियनचा रस्ता
डायरेक्ट हाणामारी! पहिल्याच षटकांत कर्णधार रोहितने पाकिस्तानला दिला विशेष संकेत