भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली मंगळवारी (5 नोव्हेंबर) आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातून त्याच्यावर वाढदिवसादिनी शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्याचवेळी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने देखील विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याने विराटकडे सर्व चाहत्यांच्या वतीने खास मागणी केली.
विराट कोहलीला सोशल मीडियावर शुभेच्छा देताना युवराज सिंगने लिहिले, ‘या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, किंग कोहली. निराशेनंतरच आशा निर्माण होते. संपूर्ण जग तुझ्याकडे त्याच आशेने पाहत आहे. तु याआधीही अशा अपेक्षा पूर्ण केल्या आहेत आणि यावेळीही तु तेच करशील याची मला खात्री आहे. खूप प्रेम.’
युवराज सिंगने आपल्या अभिनंदनाच्या संदेशात थेट काहीही लिहिले नसले तरी, विराटने फॉर्ममध्ये परतावे आणि मोठी खेळत जगभरातील चाहत्यांची प्रतीक्षा संपवावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. युवराज आणि विराट मोठ्या काळापासून जवळचे मित्र मानले जातात. विराटच्या सुरुवातीच्या काळात युवराजने त्याच्यासोबत अनेक गमतीजमती केलेल्या कथा आहेत. तसेच, युवराजच्या कारकिर्दीच्या अखेरीस विराटने त्याला पाठिंबा दिलेला.
Wishing you a very Happy Birthday #KingKohli! The greatest comebacks emerge from our setbacks and the world eagerly looks forward to your solid comeback 🔥 you’ve done it in the past and I’m sure you will do it yet again 💪🏻🙌🏻 God bless! lots of love ❤️ @imVkohli pic.twitter.com/wo9hrzUehq
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) November 5, 2024
विराट कोहलीला त्याच्या 36 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा युवराज सिंग एकटा नव्हता. त्याच्याशिवाय टीम इंडियाच्या खेळाडूंसह अनेक माजी क्रिकेटपटूंनीही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा, एस बद्रीनाथ व सुरेश रैनानेही विराटचे अभिनंदन केले आणि त्याला चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर जगभरातील तमाम चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पोहोचवल्या.
विराट सध्या खराब फॉर्म मधून जात असून, त्याची नजीकच्या काळातील कामगिरी तितकी चांगली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो केवळ एक अर्धशतक झळकावू शकला होता. त्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट आणि बाबर एकाच संघातून खेळणार, 17 वर्षांनंतर पुन्हा योगायोग जुळून येणार?
रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घ्यावी, माजी दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!
IPL 2025; संघाने रिलीज केल्यानंतर ‘या’ स्टार खेळाडूने अनफाॅलो करत फोटोही केले डिलीट