भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चेन्नई येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान अनेक मनोरंजक दृश्ये पाहायला मिळाली. तत्पूर्वी दिग्गज विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान तो बांगलादेशच्या एका गोलंदाजासोबत थट्टा करताना दिसला. कोहलीने शाकिब अल हसन ते लसिथ मलिंगा (Lasith Malinga) या गोलंदाजाला जोडले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
चेन्नई कसोटीत भारताने 308 धावांची आघाडी घेतली आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांवर सर्वबाद झाला होता. दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 गडी गमावून 81 धावा केल्या होत्या. कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. कोहली 37 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. दरम्यान शाकिब अल हसन कोहलीच्या जवळ उभा होता. कोहली म्हणाला, “हा मलिंगा आहे, यॉर्करनंतर यॉर्कर टाकतो.” हे ऐकून शाकिबला हसू आवरता आले नाही. त्याचा व्हिडिओही एक्स वर शेअर करण्यात आला आहे.
Virat Kohli to Shakib: Malinga bana hua, yorker pe yorker de raha hai 😭🤣pic.twitter.com/Ny1S6xUmkb
— Vahini🕊️ (@fairytaledustt_) September 20, 2024
भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर रंगला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात कोहलीने 6 धावा करून बाद झाला, तर दुसऱ्या डावात तो 17 धावा करून बाद झाला. कोहली पहिल्या कसोटी सामन्यात फ्लाॅप ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकापूर्वी श्रीलंकेचा मोठा डाव, स्टार फिरकीपटूचा संघात समावेश
IND vs BAN: एकाच दिवशी पडल्या 17 विकेट्स, 1979 नंतर चेपॉकवर पहिल्यांदाच असं घडलं
IND vs BAN: 17 धावांवर बाद होऊनही कोहलीने रचला इतिहास!