एकही आयपीएल ट्रॉफी न जिंकणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएल 2023 हंगामात शानदार कामगिरी करत आहे. या हंगामात माजी कर्णधार विराट कोहली हादेखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विराटने आतापर्यंत 6 सामने खेळून त्यात 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. मागील सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध विराट कोहली याने बेंगलोर संघाचे नेतृत्वही केले होते. एवढेच नाही, तर नेतृत्व करताना बेंगलोरला 24 धावांनी विजयही मिळवून दिला होता. अशातच विराटचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट कोहली ब्लाईंड फोल्ड चॅलेंज करताना दिसत आहे.
विराट कोहली याने डोळ्यावर पट्टी बांधूनही खेळाडूंना ‘कसे’ ओळखले?
खरं तर, आरसीबीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहली (Virat Kohli) याचा एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये विराट डोळ्यावर पट्टी बांधून आपल्या संघसहकाऱ्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ मोहालीत पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतरचा आहे.
खरं तर, विराट कोहली ब्लाईंड फोल्ड चॅलेंज (Virat Kohli Blindfold Challenge) खेळ खेळताना दिसला. यावेळी त्याने सर्वप्रथम दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला त्याच्या दाढीवरून ओळखळे. यानंतर त्याने मोहम्मद शमी याला त्याच्या घड्याळावरून ओळखले. त्यानंतर विराटने फाफ डू प्लेसिस याला स्पर्श केल्यानंतर म्हटले की, “डाव्या हातात कोणतेही घड्याळ नाहीये आणि उजव्या हातात घड्याळ आणि टॅटू.”
https://www.instagram.com/p/CrTAcsiAMcZ/?img_index=1
शेवटी विराटचा सामना अशा व्यक्तीसोबत झाला, ज्याचा क्रिकेटशी दूरपर्यंत काहीच संबंध नाही. मात्र, विराटने या व्यक्तीला सर्वप्रथम स्पर्श करताच, म्हटले की, “हा कोण आहे, मुलगा वाटतोय. जरा उंची मोजू. याचे केस खूपच मजबूत आहेत आणि हा अष्टपैलू आहे.” यानंतर विराट म्हणाला की, “हा चेंडू घेऊन आलाय, हा तर भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आहे.”
आयपीएल 2023मध्ये विराटची कामगिरी
विराट कोहली हा आयपीएल 2023मध्ये 6 सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल पाच खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानी असलेला एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याने 6 सामन्यात 55.80च्या सरासरीने 279 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचाही समावेश आहे. यात नाबाद 82 ही विराटची हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या आहे. (virat kohli hilarious reaction to blindfold challenge with rcb players see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! क्रिकेट खेळताना 14 वर्षीय मुलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, पुणे हादरलं
माझ्या रे नादाला लागू नको! लाईव्ह सामन्यात जडेजाची हैदराबादी खेळाडूला खुन्नस; धोनीने केले शांत, Video